शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
3
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
4
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
5
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
6
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
7
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
8
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
9
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
11
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
12
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
13
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
14
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
15
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
16
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी

आंबे पिकविण्यासाठी अजूनही होतोय प्रतिबंधित कॅल्शियम कार्बाइडचा उपयोग !

By मोरेश्वर मानापुरे | Updated: June 6, 2024 20:27 IST

रसायनाने पिकलेले आंबे आरोग्यासाठी घातक : सरकारची एथिलीन रिपनरच्या वापराला परवानगी

नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) संथ कारवाईमुळे यंदाच्या हंगामात कळमन्यातील फळे व्यापारी आंबे पिकविण्याठी प्रतिबंधित कॅल्शियम कार्बाइड रसायनाचा सर्रास उपयोग करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) तीन वर्षांआधी अधिसूचना काढून फळे पिकविण्यासाठी एथिलीन रिपनर रसायनाच्या वापराला अधिकृत परवानगी दिली आहे. या रसायनाने आंबे उशिरा पिकतात. त्यामुळेच झटपट नफा कमविण्यासाठी पर्याय म्हणून कळमन्यातील व्यापारी पुन्हा प्रतिबंधित कॅल्शियम कार्बाइडकडे वळले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून व्यापाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने कळमन्यात या रसायनाचा सर्रास उपयोग होत असल्याचे व्यापाऱ्यांनी खासगीत सांगितले. दुसरीकडे कॅल्शियम कार्बाइड रसायनाचा उपयोग आता बंद झाल्याचे एफडीएच्या अधिकारी सांगतात. अर्थपूर्ण व्यवहारामुळे व्यापाऱ्यांवर कारवाई होत नसल्याचा ग्राहक पंचायतचा आरोप आहे.

एथिलीन रिपनरने दोन दिवसातच पिकतात आंबेभारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या अधिसूचनेनंतर फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडऐवजी एथिलीन रिपनर रसायनाचा उपयोग होऊ लागला. या रसायनाने दोन दिवसातच आंबे पिकतात. पाऊच स्वरुपात चीन देशातून आलेले हे रसायन ओले करून आंब्याच्या पेटीत ठेवतात. या रसायनाचा आरोग्यावर परिणाम होत नसल्याचे सरकारचे मत आहे. पण सरकारचा दावा खरा नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. नैसर्गिक पद्धतीने पिकलेले आंबे आरोग्यासाठी नेहमीच उत्तम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. व्यापारी नफा कमविण्यासाठी आधीही प्रतिबंधित कॅल्शियम कार्बाइडचा उपयोग करायचे. आता त्याऐवजी सरकारमान्य दुसरे रसायन आले आहे. शेवटी मानवी आरोग्याशी खेळ होतोच.

केवळ दोन पाऊचने आंब्याची पेटी पिवळीधम्मसध्या आंब्याचा हंगाम आहे. सर्वच प्रकारचे आंबे कळमन्यात विक्रीसाठी येत आहेत. सध्या आवक वाढली आहे. त्यामुळे आंबे पिकविण्यासाठी रसायनाचा उपयोग होत आहे. याआधीही विकलेले आंबे कोणत्या रसायनाने पिकविले होते, याची माहिती विभागाकडे नाही. शिवाय किती कारवाऱ्या झाल्या, याचीही नोंद नाही. या रसायनाबाबत अधिकारी अनभिज्ञ आहेत. पिकलेल्या आंब्याची प्रयोगशाळेत तपासणी केल्यास आंब्यात रसायन असल्याचे निष्पन्न होत नाही. त्यामुळे ग्राहकांनीच आंबे जपून खावेत, असा सल्ला ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर