शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
2
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
3
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
4
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
5
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
6
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
7
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
8
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
9
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
10
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना
11
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
12
MS Dhoni ची मोठी घोषणा! चाहतेही पडले संभ्रमात; लवकरच दिसणार नव्या भूमिकेत
13
"हा नवा भारत घरात घुसून मारतो, पण आम्ही..."; मोदींच्या भाषणाचा उल्लेख करत पाकिस्तानी राजदूताची धमकी
14
KKR vs SRH : ...अन् शाहरूख खानला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं, पाहा Video
15
ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार
16
'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप
17
ऐन निवडणुकीत प्रमुख नेत्यांना मारण्याचा कट; अटक केलेल्या युवकाचे पाकिस्तानशी कनेक्शन
18
“मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका बसला, राज्यात महायुतीला...”: महादेव जानकर
19
'मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई'; गजानन कीर्तिकरांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र
20
Swati Maliwal : "काल पक्षाच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला अन्..."; स्वाती मालीवाल यांचा गंभीर आरोप

बँकांनी वेळेवर कर्जपुरवठा करावा : पालकमंत्री बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 9:17 PM

शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी बँकांनी आवश्यकतेनुसार वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक गावनिहाय कर्ज मेळाव्याचे आयोजन करून शेतकऱ्यांना सहज व सुलभपणे कर्जपुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांसाठी कर्जमेळावे घ्यावेत, १३४ कोटी ४३ लक्ष रुपयांचे कर्ज वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी बँकांनी आवश्यकतेनुसार वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक गावनिहाय कर्ज मेळाव्याचे आयोजन करून शेतकऱ्यांना सहज व सुलभपणे कर्जपुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.बचतभवन सभागृहात खरीप हंगामातील कर्जवाटप तसेच कर्जमाफीसंदर्भात विविध राष्ट्रीयकृत व खासगी बँकांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बारापात्रे आदी उपस्थित होते. खरीप हंगामासाठी विविध बँकांना ९७९ कोटी ९५ लक्ष रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापैकी आतापर्यंत केवळ १३ हजार ६९४ खातेदार शेतकऱ्यांना १३४ कोटी ४३ लक्ष रुपयांचे कर्जवाटप केले आहे. पावसाळ्यापूर्वी शेतकºयांना शेतीसाठी आवश्यक असलेले बियाणे, खते तसेच शेतीच्या मशागतीसाठी कर्जाची आवश्यकता असल्यामुळे प्रत्येक गावात तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी शाखानिहाय कर्ज मेळावे आयोजित करावेत. या कर्ज मेळाव्यात उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जपुरवठा होईल, यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले.खरीप कर्ज वाटपासाठी मागील वर्षी उद्दिष्टापैकी केवळ ७२४ कोटी रुपये म्हणजेच ६० टक्के कर्जवाटप पूर्ण केले होते. परंतु यावर्षी दिलेले उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यासाठी बँकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेण्याची सूचना करताना बावनकुळे म्हणाले की, महसूल विभाग व सहकार विभागातर्फे आवश्यक असलेली संपूर्ण मदत बँकांना देण्यात येईल.शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात ७० हजार ३५६ शेतकऱ्यांचे ४३४ कोटी ५२ लक्ष रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. यामध्ये ५० हजार २९१ शेतकऱ्यांचे ३४१ कोटी ५५ लक्ष रुपयांचे कर्जमाफी, ओटीएस योजनेमध्ये ५ हजार ५५७ शेतकऱ्यांना ६० कोटी ९५ लक्ष रुपये तर इन्सेन्टिव्ह योजनेमध्ये १४ हजार ३०८ शेतकऱ्यांना ३२ कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.प्रारंभी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बारापात्रे यांनी खरीप कर्ज योजनेंतर्गत जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट व विविध बँकांनी कृषी कर्जपुरवठा यासंदर्भात केलेल्या कामांचा आढावा घेतला.विशेष काऊंटर सुरू करावेराष्ट्रीयकृत बँकांनी १० हजार ८९२ शेतकऱ्यांना १०८ कोटी ४१ लक्ष रुपयांचे कर्ज दिले आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २ हजार ४७२ खातेदारांना २१ कोटी ७५ लाख तर ग्रामीण बँकांनी ३३० खातेदारांना ४ कोटी २९ लक्ष रुपये उपलब्ध करून दिले असून कर्जवाटपाच्या तुलनेत केवळ १३ ते २४ टक्केच काम बँकांनी केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ६ टक्के , बँक ऑफ बडोदा १९ टक्के, बँक ऑफ महाराष्ट्र ३३ टक्के तर बँक ऑफ इंडियातर्फे ३१ टक्के कर्जवाटप पूर्ण झाले आहे. कर्जवाटपाचे उद्दिष्ट सर्वच बँकांनी पूर्ण करावे, असे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. तसेच बँकेत येणाऱ्या प्रत्येक शेतकºयाला योग्य मार्गदर्शन करून जास्तीत-जास्त कर्जपुरवठा कसा उपलब्ध करून देता येईल, यासाठी बँकांनी विशेष काऊंटर सुरू करावे, असे निर्देशही यावेळी दिले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेbankबँकFarmerशेतकरी