शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

 बँकेचे संचालकपद ८ वर्षांसाठीच; बँकिंग नियमन सुधारणा कायदा 

By मोरेश्वर मानापुरे | Updated: June 5, 2023 19:10 IST

पंजाब आणि महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर २० जून २०२२ पासून बँकिंग नियमन सुधारणा कायदा लागू झाला.

नागपूर : पंजाब आणि महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर २० जून २०२२ पासून बँकिंग नियमन सुधारणा कायदा लागू झाला. सहकारी बँकांमधील संचालकांना ८ वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर राहता येणार नाही, अशी तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली असून सहकारी बँकांमधील ८ वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर असलेल्या संचालकांची माहिती मागविली आहे. यामुळे सहकारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

हा कायदा लागू झाल्यामुळे नागरी सहकारी बँकांच्या नियमांमध्ये अनेक बदल झाले आहेत. कायद्यात दुरुस्ती करताना सहकारी बँकेच्या संचालकाला दोन टर्नपेक्षा जास्त काळ पदावर राहता येत नाही. याकरिता ८ वर्षांचा कार्यकाळ नमूद करण्यात आला आहे. पण सहकारी क्षेत्रात एक टर्न पाच वर्षांची अर्थात दोन टर्न दहा वर्षांची आहे. नवीन कायद्यात दोन टर्न संचालक पदावर राहिल्यानंतर एक टर्न गॅप देऊन संचालक पुन्हा दोन टर्न पदावर राहू शकतो, अशी तरतूद आहे. त्यामुळे आठ वर्षांच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह आहे. कायद्यात आणखी सुधारणा होऊन संचालकांसाठी आठऐवजी दहा वर्षांचा कार्यकाळ होऊ शकतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. 

तरुणांना मिळेल काम करण्याची संधीसध्या सहकार क्षेत्रात नवीन जोमाचे तरुण येत नाही. त्यांना या क्षेत्राचे ज्ञान नाही, असे नाही, तर त्यांना २५ वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर राहिलेले लोक या क्षेत्रात येऊच देत नाहीत. पण बँकिंग नियमन सुधारणा कायद्यामुळे तरुणांना सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. तर दुसरीकडे सहकार क्षेत्रात अनुभवी लोकांची पोकळी निर्माण होईल आणि कामावर परिणाम होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. रिझर्व्ह बँकेने या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू केल्यास सहकारी बँकांचे अनेक पदाधिकारी आणि संचालकांना खुर्ची खाली करावी लागेल. त्यामुळे बहुतांश बँकांमधील संचालकाची पदे रिक्त होतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

तरुणांना सहकार क्षेत्रात कामाची संधी मिळावी यासाठी सहकारी बँकांच्या संचालकपदी जास्तीत जास्त दोन वेळा किंवा आठ वर्षांपेक्षा जास्त काळ राहता येणार नाही. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. निकालासाठी काही वर्ष वाट पाहावी लागेल. - सतीश मराठे, संचालक, रिझर्व्ह बँक.

संचालकांच्या दोन टर्न ही अतिशय चांगली बाब आहे. यामुळे तरुणांना सहकार क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन आणि संधी मिळेल. सध्या रिझर्व्ह बँकेने माहिती मागविली आहे. कायद्यानुसार एक टर्नची गॅप राहून संचालक पुन्हा दोन टर्न पदावर राहू शकतो. - विवेक जुगादे, सहकार भारती. 

टॅग्स :nagpurनागपूरReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक