शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

घुसखोरी करून नागपुरात आलेली  बांगलादेशी महिला गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 01:17 IST

घुसखोरी करून आल्यानंतर १८ वर्षांपासून भारतात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या  बांगलादेशी महिलेला तहसील पोलिसांनी अटक केली. सालेहा परवीन अमजद हुसेन (वय ४१) असे तिचे नाव असून ती मोमीनपुऱ्यात राहत होती.

ठळक मुद्दे१८ वर्षांपासून भारतात बेकायदा वास्तव्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घुसखोरी करून आल्यानंतर १८ वर्षांपासून भारतात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या  बांगलादेशी महिलेला तहसील पोलिसांनी अटक केली. सालेहा परवीन अमजद हुसेन (वय ४१) असे तिचे नाव असून ती मोमीनपुऱ्यात राहत होती.१ जानेवारी २००० रोजी सालेहा नागपुरात आली. येथे १८ वर्षांपासून बेकायदा वास्तव्य करतानाच तिने येथे आधारकार्ड, शिधापत्रिका, पासपोर्ट आणि व्होटिंग कार्डही बनवून घेतले. या प्रकाराची माहिती तहसील पोलिसांना मिळाली. चौकशीअंती ती बांगलादेशी नागरिक असल्याचे आणि येथे ती अवैधपणे वास्तव्य करीत असल्याचे स्पष्ट झाल्याने शनिवारी तिला अटक करण्यात आली. तिच्याविरुद्ध नायक प्रमोद धोटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी कलम ४१९, ४२०, ४६८, ४७१ भादंवि तसेच कलम १२ (ब) आणि पासपोर्ट अधिनियम कलम १४ (विदेशी व्यक्ती अधिनियम) गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली. अशाप्रकारे अवैध वास्तव्य करणारे अनेक बांगलादेशी घुसखोर नागपुरात अनेक वर्षांपासून वास्तव्याला आहेत, हे विशेष!जाणे-येणेही सुरूच होतेपोलिसांनी तिला अटक केल्यानंतर दुसरी एक धक्कादायक बाब उघडकीस आली. ती म्हणजे, सालेहा अधूनमधून मायदेशी बांगलादेशात जात होती अन् परत नागपुरात येत होती. तिच्याकडे दोन पासपोर्टही आढळून आले. ती १३ फेब्रुवारीलाच आपली मायदेशवारी करून नागपुरात परत आल्याचे पोलीस सांगतात. मोमीनपुऱ्यातील अनेक धनिक कुटुंबांकडे ती घरकाम करीत होती, असे तिने पोलिसांना सांगितले आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरArrestअटक