शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'स्वदेशी'चं काय झालं..?; लोकपाल सदस्यांना ७० लाखांची BMW देण्यावरून राजकारण तापलं !
2
कठीण काळात आणखी घट्ट होतेय भारत-रशिया मैत्री; प्लॅन जाणून ट्रम्प यांचा आणखी थयथयाट होणार!
3
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
4
Viral Video: गळ्यात गमछा, कमरेला लुंगी! भोजपुरी गाण्यावर तरुणीचा जबरदस्त डान्स, नेटकरी झाले फिदा
5
बाल्कनीतून पाय घसरला, पती ग्रिलवर लटकला; वाचवण्यासाठी पत्नी धावली, पण नियतीने डाव साधला!
6
सर्वसामान्यांसाठी खुशखबर...! लग्नसराईपूर्वीच सोन्या-चांदीच्या भावात घसरण, चेक करा १८,२२,२३ अन् २४ कॅरेटचा लेटेस्ट रेट
7
३ दिवसांत २७% नी वाढला 'हा' छोटा शेअर; एकावर १ फ्री स्टॉक देणार कंपनी, शेअर विभाजनाचीही घोषणा
8
जेवण केलं, पत्नीसोबत खोलीत गेले, त्यानंतर बाथरूमध्ये जाताच..., ब्राह्मोसवर काम करणाऱ्या इंजिनियरचा संशयास्पद मृत्यू
9
जिद्दीला सॅल्यूट! अवघ्या २२ व्या वर्षी झाली IAS; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
10
“आम्हाला राहुल गांधींना PM करायचेय, काँग्रेस मुंबईचे महापौरपद काय घेऊन बसलेय”: संजय राऊत
11
Gulab Jamun : ना गुलाब ना जामून, मग या गोड पदार्थाला कसं पडलं हे नाव? सगळ्यांनाच खायला आवडतं पण माहिती कुणालाच नसेल!
12
इंदूरमध्ये पेंटहाऊसला भीषण आग; 'डिजिटल लॉक' अडकल्याने काँग्रेस नेत्याचा गुदमरून मृत्यू, पत्नी, मुलीची प्रकृती चिंताजनक
13
कुटुंबीयांना कॉल केला अन्...; रशियात नदीकाठी सापडले कपडे, ३ दिवसांपासून अजित बेपत्ता
14
Crime: तीन वर्षांच्या मुलासह महिलेची सातव्या मजल्यावरून उडी; सासरच्या लोकांवर गंभीर आरोप
15
Railway Accident: 'रील'चे वेड जीवावर बेतले; रेल्वेच्या धडकेत १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
16
"त्यांचा काहीतरी व्हिडीओ हाताला..."; मुंबईत कमळ फुलणार म्हणणाऱ्या महेश कोठारेंवर मनसेचा निशाणा
17
महाआघाडीचं ठरलं, बिहारमध्ये तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, तर उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' नेत्याच्या नावाची घोषणा
18
भ्रष्टाचारावर 'महागडी' नजर! ७० लाखाच्या BMW कारमधून फिरणार लोकपाल; ड्रायव्हर्सनाही ट्रेनिंग
19
"मी सौदी अरेबियात अडकलोय, वाळवंटात उंट...", ढसाढसा रडत तरुणाने मागितली मोदींकडे मदत
20
Meta Layoffs: आता AI कर्मचाऱ्यांनाच कपातीचा फटका! Mark Zuckerberg च्या एआय टीममधील शेकडो लोकांना नारळ

बांगलादेशी आयात शुल्काने पिळला नागपुरी संत्रा; रोजची निर्यात २०० ट्रकवरून २५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2022 08:30 IST

Nagpur News आधीच अतिवृष्टीचा मार सहन केल्यानंतर आता बांगलादेशच्या वाढीव आयात शुल्काने नागपुरी संत्रा पुरता पिळून काढला आहे.

ठळक मुद्दे प्रती टन १५ हजार रुपयांनी भाव गडगडले

कमलेश वानखेडे

नागपूर : आंबट गोड चवीसाठी नागपूर-विदर्भातील संत्रा जगभर प्रसिद्ध आहे. मात्र, आधीच अतिवृष्टीचा मार सहन केल्यानंतर आता बांगलादेशच्या वाढीव आयात शुल्काने नागपुरी संत्रा पुरता पिळून काढला आहे. बांगलादेशने संत्र्यावरील आयात शुल्क वाढवून प्रती किलो तब्बल ६३ रुपये केले आहे. याचा जबर फटका निर्यातीला बसला असून, यामुळे संत्र्यांची उचल कमी झाली आहे. परिणामी संत्र्याचे भाव गडगडले आहेत. ऑक्टोबर महिन्यात २५ ते ४० हजार रुपये प्रती टनाने विकल्या जाणाऱ्या संत्र्याचे भाव २० ते २५ हजार रुपये टनांपर्यंत खाली आले आहेत. याचा मोठा आर्थिक फटका विदर्भातील संत्रा उत्पादकांना बसतो आहे.

विदर्भातील वरुड, मोर्शी, परतवाडा, अचलपूर, चांदूरबाजार, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर या भागात मोठ्या प्रमाणात संत्रा पिकतो. विदर्भातील एकूण संत्रा उत्पादनाच्या सुमारे ३५ टक्के संत्र्याची निर्यात बांगलादेशमध्ये केली आहे. गेल्यावर्षी विदर्भातील दररोज सुमारे २०० ट्रक संत्र्याची बांग्लादेशला निर्यात व्हायची. एका ट्रॅकमध्ये साधारणत: २५ ते २७ टन संत्रा असतो. गेल्यावर्षी दोन महिन्यांत सुमारे चार लाख टन संत्रा बांगलादेशला निर्यात करण्यात आला. मात्र, यावर्षी बांगलादेशकडून संत्र्यावरील आयात शुल्कात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी ५१ रुपये प्रती किलो असलेले आयात शुल्क यावर्षी वाढवून ६३ रुपये करण्यात आले. गेल्या तीन वर्षांत आयात शुल्कात तिप्पट वाढ झाली आहे. यामुळे व्यापाऱ्यांकडून संत्र्याची उचल कमी झाली असून, दररोज जेमतेम २० ते २५ ट्रकच माल निर्यात केला जात आहे. यामुळे संत्र्यांचे भाव गडगडले आहेत.

देशांतर्गत साठा वाढला, भाव पडले

- विदर्भातील संत्रा नागपुरातील कळमना मार्केटसह कोलकाता, आंध्र प्रदेश, केरळ, दिल्ली, बंगलोरमध्ये विकला जातो. मात्र, निर्यात कमी झाल्याने या देशांतर्गत बाजारपेठांमध्येही संत्र्याचा साठा वाढला आहे. त्यामुळे देशांतर्गतही संत्र्यांची उचल घटली आहे. परिणामी भाव टनामागे १५ हजार रुपयांपर्यंत घसरले आहेत.

केंद्र सरकारने दखल घ्यावी

- गेल्या तीन वर्षांत बांगलादेशने संत्र्यांवरील आयात शुल्क तिप्पट केले. यावर्षी ऐन हंगामात पुन्हा वाढ केली. याचा परिणाम निर्यातीवर होत असून, संत्र्याचे भाव गडगडले आहेत. आधीच अतिवृष्टीमुळे संत्रा गळाला. उत्पादन घटले. आता वाढीव आयात शुल्कामुळे विदर्भातील संत्रा उत्पादकांवर दुहेरी मार पडत आहे. केंद्र सरकारने त्वरित याची दखल घेत बांगलादेश सरकारशी चर्चा करण्याची गरज आहे.

- मनोज जवंजाळ

- संचालक, महाऑरेंज

 

बांगलादेशने असे वाढविले आयात शुल्क

२०१९ - २० रुपये

२०२० - ३० रुपये

२०२१ - ५१ रुपये

नोव्हेंबर २०२२ - ६३ रुपये

टॅग्स :fruitsफळे