शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

नर्सरीमध्ये बीजारोपणासाठी पॉलिथीन बॅगवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 20:38 IST

वनखात्याच्या नर्सरीजमध्ये बीजारोपण आणि रोपटे वाढीसाठी पॉलिथीन बॅग वापरावर केंद्र शासनाने बंदी घातली आहे. २०२२ पर्यंत देश प्लास्टिकमुक्त करण्याच्या दृष्टीने केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने राज्यातील वन खात्याच्या सर्व विभागांना हे आदेश जारी केले आहेत.

ठळक मुद्देकेंद्राच्या पर्यावरण मंत्रालयाचे आदेश : वनखात्यासमोर पर्यायी व्यवस्थेचा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वनखात्याच्या नर्सरीजमध्ये बीजारोपण आणि रोपटे वाढीसाठी पॉलिथीन बॅग वापरावर केंद्र शासनाने बंदी घातली आहे. २०२२ पर्यंत देश प्लास्टिकमुक्त करण्याच्या दृष्टीने केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने राज्यातील वन खात्याच्या सर्व विभागांना हे आदेश जारी केले आहेत.प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि महाराष्ट्र वनविभागाच्या वनबळ प्रमुखांना याबाबत १२ नोव्हेंबर रोजी वनविभागाचे उपमहानिरीक्षक रोहित तिवारी यांचे पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रानुसार राज्यातील सर्व नर्सरींमध्ये पॉलिथीनचा वापर बंद करून बीजारोपण व रोपट्यांसाठी पर्यायी व्यवस्थेचा उपयोग करण्याची सूचना देण्यात आली आहे. हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू करण्यात यावा, जेणेकरून पुढच्या वृक्षारोपणाच्या ऋतूपर्यंत सर्व नर्सरीज प्लास्टिकमुक्त करण्यास मदत होईल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.प्लास्टिक पिशव्या स्वस्त व सहज उपलब्ध होतात. शिवाय त्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असल्याने बीज किंवा रोपट्याला वारंवार पाणी देण्याची गरज भासत नाही. त्यामुळे या प्लास्टिक पिशव्यांचा वापर नर्सरीजमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. प्लास्टिक बंदी केल्याने पुढे कोणता पर्याय घ्यावा, हा प्रश्न नर्सरी चालकांना पडू शकतो. प्लास्टिक पिशव्यांचे हे फायदे असले तरी त्याचे पर्यावरणावर होणारे घातक परिणामही लक्षात घेणे आवश्यक आहे. रोपट्यांच्या या लहान पिशव्यांमुळे मोठे प्रदूषण होतेच, शिवाय या पिशव्या ड्रेनेजमधील वाहते पाणी रोखण्यासही कारणीभूत ठरतात. हे पॉलिथीन पोटात गेल्याने पाळीव प्राणी व वन्यजीवांवरही मृत्यू ओढवतो. शिवाय वायुप्रदूषणाचा धोका आहेच. मात्र प्रश्न पर्यायी व्यवस्थेचा आहे. आदेश धडकल्याने प्लास्टिकचा उपयोग बंद करावा लागेल हे निश्चित. त्यामुळे कॉटन, घायपात, गवत किंवा पेपरच्या बॅग वापरणे शक्य होऊ शकते. सहजरीत्या नष्ट होऊ शकतील आणि पर्यावरणाला हानीकारक ठरणार नाही अशा पर्यायी व्यवस्थेचा वापर आवश्यक आहे. ग्रामीण भागातील महिलांकडून अशा बॅगची निर्मिती केली जाऊ शकते. त्यामुळे त्यांना रोजगारही मिळेल, असे मत व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीforest departmentवनविभाग