शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बाल्या बिनेकर हत्याकांड : पडद्यामागचे सूत्रधार पडद्यामागेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 00:05 IST

Balya Binekar murder case, crime news, Nagpur सर्वत्र प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या बाल्या बिनेकर हत्याकांडातील पडद्यामागच्या आरोपींना हुडकून काढण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. दरम्यान, या प्रकरणाचा तपास रेंगाळत असल्याचा आता आरोप होत आहे.

ठळक मुद्देतपास रेंगाळल्याची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वत्र प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या बाल्या बिनेकर हत्याकांडातील पडद्यामागच्या आरोपींना हुडकून काढण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. दरम्यान, या प्रकरणाचा तपास रेंगाळत असल्याचा आता आरोप होत आहे. त्यामुळे मृताचे नातेवाईकच नव्हे तर गुंडांच्या दहशतीने थरारलेल्या नागपूरकरांमध्येही पोलिसांच्या कार्यपद्धतीमुळे रोष निर्माण झाला आहे.या हत्याकांडाला आता सात दिवस पूर्ण झाले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या पाच आरोपींना आणि त्यांना मदत करणाऱ्या दोन अशा एकूण सात जणांना अटक केली आहे. मात्र या हत्याकांडाचा पडद्यामागे राहून कट रचणाऱ्या आरोपींना पकडण्यात सीताबर्डी पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. जुगार चालविण्याच्या स्पर्धेतून हे हत्याकांड घडवून आणल्याची शहरभर जोरदार चर्चा आहे. या हत्याकांडाला शहरातील गुन्हेगारांच्या मांडवल्या करून देणाऱ्या आणि मोठमोठ्या जुगाऱ्यांची रक्कम इकडून तिकडे करणारा एक कुख्यात जबाबदार असल्याचीही सर्वत्र चर्चा आहे. मात्र त्याला पकडण्यात पोलिसांनी आतापर्यंत यश मिळवले नाही. या संबंधाने उलटसुलट चर्चा सुरू आहे. तपासाशी संबंधित असलेल्या एकाने जुगार अड्ड्यावरचा तीन वर्षांपूर्वी भरपूर मलिदा खाल्ल्यामुळे तो गुन्हेगारी वर्तुळातील चर्चेकडे दुर्लक्ष करीत असल्याचीही जोरदार चर्चा आहे. सात दिवस होऊनही या हत्याकांडाचे फंड सप्लायर तसेच पडद्यामागचे सूत्रधार पोलिसांनी पकडलेले नाहीत. तपासही रेंगाळल्यासारखा झाला आहे. त्यामुळे मृताचे नातेवाईक, समर्थक तसेच दहशतीत असलेल्या नागरिकांमध्येही रोष निर्माण झाला आहे.खामल्याची चर्चादरम्यान, या गुन्ह्याशी संबंध असल्याच्या चर्चेवरून गुन्हे शाखेत आतापर्यंत डझनभर संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. आजही खामल्यातील एकाची चौकशी करण्यात आल्याची जोरदार चर्चा होती. मात्र कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याकडून या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून