शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपूर्वी विकली गेली नागपुरातील ‘बालिका वधू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 20:48 IST

लग्नाचे आमीष दाखवून दोन वर्षांपूर्वी केवळ एक लाख रुपयांत राजस्थानमधील कोटा येथे एका अल्पवयीन मुलीला विकण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पीडित अल्पवयीन मुलीने फोन केल्याने हा प्रकार समोर आला. गुन्हे शाखा पोलिसांनी नवरदेवासह आंतरराज्यीय टोळीच्या तीन सदस्यांना पकडले आहे.

ठळक मुद्देनवरदेवासह टोळीच्या तीन सदस्यांना अटक आर्थिक परिस्थितीमुळे अल्पवयीन मुलीने सोडले होते घर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्नाचे आमीष दाखवून दोन वर्षांपूर्वी केवळ एक लाख रुपयांत राजस्थानमधील कोटा येथे एका अल्पवयीन मुलीला विकण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पीडित अल्पवयीन मुलीने फोन केल्याने हा प्रकार समोर आला. गुन्हे शाखा पोलिसांनी नवरदेवासह आंतरराज्यीय टोळीच्या तीन सदस्यांना पकडले आहे. पंकज हनुमान आपतुरकर (३०) रा. भवानीनगर पारडी, श्यामलाल रामकिसन गुजर (३३) आणि सुरेंद्र जगन्नाथ चौधरी (२७) झालावाड, कोटा राजस्थान अशी आरोपीची नावे आहे. पंकज आॅटो चालक आहे.पीडित १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी अजनी येथील रामटेकेनगरात राहते. तिच्या कुटुंबात आई आणि भाऊ आहे. आई मजुरी करते. आर्थिक परिस्थितीमुळे घरात नेहमी वाद होत होते. डिसेंबर २०१६ मध्ये आईसोबत तिचे असेच भांडण झाल्याने ती घरातून निघून गेली होती. या दरम्यान तिची पंकजसोबत ओळख झाली. पंकज मानवी तस्करीच्या आंतरराज्यीय टोळीचा सदस्य आहे. त्याने पीडित अल्पवयीन मुलीची मानसिक अवस्था ओळखली. त्याने तिला चांगल्या कुटुंबात लग्न किंवा नोकरी लावून देण्याचे आमीष दाखविले. तो तिला एका महिला दलालाकडे घेऊन गेला. तिने एक-दोन दिवस तिला आपल्या घरी ठेवले. याचदरम्यान पंकजने मध्यप्रदेशातील एका दलालाशी संपर्क केला आणि त्याच्याकडे पीडित मुलीला सोपविले. मध्यप्रदेशातील दलाल तिला राजस्थानला घेऊन गेला. तिथे या मुलीला श्यामलाल गुजर नावाच्या व्यक्तीला विकले. श्यामलालने तिला सुरेंद्र चौधरी नावाच्या व्यक्तीला एक लाख रुपयात विकले. सुरेंद्रने बोगस दस्तावेजाच्या मदतीने तिच्याशी लग्न केले आणि तिला आपल्या घरी बंधुआ मजूर म्हणून ठेवले. तिला घराबाहेर जाऊ दिले जात नव्हते. सुरेंद्रचे कुटुंबीय तिच्यावर पाळत ठेवायचे. तिच्या हाती मोबाईलही लागू दिले जात नव्हते. काही दिवसांपूर्वी तिला गावातील शाळेच्या शिक्षकाला मोबाईल मागून कुटुंबीयांशी बोलावे, अशी युक्ती सुचली. पीडित मुलीने शाळेत पोषणआहार बनवणाऱ्या महिलेसोबत काम करण्याच्या बहाण्याने शाळेत जाण्याचे ठरविले. तिने सुरेंद्र आणि त्याच्या कुटुंबीयांना शाळेत जाऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केली. सुरेंद्रनेही परवानगी दिली. गेल्या आठवड्यात शाळेत जाताच तिने शिक्षकाला कुटुंबीयांशी बोलण्यासाठी मोबाईल मागितला. शिक्षकानेही तिला आपला मोबाईल दिला. तेव्हा तिने आपल्या आईला फोन करून आपबिती सांगितली.अजनी पोलिसांनी प्रकरण ‘एएचटीयू’ला सोपविलेअल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर आईने केलेल्या तक्रारीनुसार अजनी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. अपहृत मुलीची माहिती मिळत नसल्याने त्यांनी चार महिन्यानंतर हे प्रकरण अ‍ॅण्टी ह्युमन ट्रॅफीकिंग युनिट (एएचटीयू) ला स्थानांतरित केले होते. एएचटीयू गुन्हे विभागाची एक शाखा आहे. मीना जगताप या शाखेच्या प्रभारी पोलीस निरीक्षक आहेत. अल्पवयीन मुलीच्या आईने जगताप यांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मोबाईल नंबरच्या आधारावर तपास सुरू केला. ते शाळेजवळ पोहोचले आणि अल्पवयीन मुलीला शोधून काढले. तिला मुक्त करून कथित पती सुरेंद्र चौधरीला अटक केली. त्याच्या माहितीवरून श्यामलाल गुजर आणि पंकज आपतुरकरलाही पकडले.पूर्ण कुटुंब बर्बाद झालेअल्पवयीन मुलगी घरातून निघून गेली. तिचा कुठलाही पत्ता लागत नसल्याने तिच्या भावाने दु:खी होऊन आत्महत्या केली. तिच्या आईची मानसिक अवस्थाही बिघडली. या घटनेने पूर्ण परिवार प्रभावित झाला. मुलीचे काय झाले असेल या विचारात तिची आई नेहमी असायची. ती मिळाल्यावर खरा प्रकार लक्षात आला.लोकमतने केला होता खुलासालोकमतने १२ डिसेंबर रोजीच्या अंकात दोन लाखात मिळते वधू या शिर्षकांतर्गत वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तातून नागपुरातील अल्पवयीन मुली व महिलांना राजस्थानमध्ये विकले जात असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. ताज्या प्रकरणाने या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. सूत्रानुसार राजस्थानमध्ये मोठ्या संख्येने शहरातील अल्पवयीन मुलींना विकले जात असून त्यांचे शोषण केले जात आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHuman Traffickingमानवी तस्करी