शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांनी काढला मुंडण मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 21:37 IST

जुनी पेन्शन देण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या हजारावर कर्मचाऱ्यांनी मुंडण करून विधानभवनावर मुंडण मोर्चा काढला.

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना

आॅनलाईन लोकमतनागपूर : जुनी पेन्शन देण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या हजारावर कर्मचाऱ्यांनी मुंडण करून विधानभवनावर मुंडण मोर्चा काढला. मोर्चातील वितेश खांडेकर, गोविंद उगले, सुनील दुधे, आशुतोष चौधरी, प्राजक्त जावरे, नामदेव मेटांगे यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. मुख्यमंत्र्यांनी फॅमिली पेन्शन आणि ग्रॅच्युईटी लवकरच देऊन त्याबाबतचा जीआर काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त होणाऱ्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना शासनाने १९८२ व १९८४ ची जुनी पेन्शन योजना बंद करून डीसीपीएस/एनपीएस नावाची नवी पेन्शन योजना लागू केली आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजनाच सुरू ठेवावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने विधानभवनावर भव्य मोर्चाचे आयोजन केले. पोलिसांनी टेकडी मार्गावर हा मोर्चा अडविला. जुन्या पेन्शनप्रमाणे कर्मचारी मृत, सेवानिवृत्त झाल्यास पेन्शनचे लाभ मिळत नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यात आर्थिक असुरक्षितता निर्माण झाली आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांनी मुंडण करीत मोर्चात सहभागी होऊन आपला रोष व्यक्त केला. या मोर्चाचे नेतृत्व वितेश खांडेकर, गोविंद उगले, सुनील दुधे, प्रवीण बडे आदींनी केले. २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे मृत्यू व सेवानिवृत्त उपदानाचा लाभ द्यावा, नवीन कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारे शासन निर्णय रद्द करावे आदी मागण्या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.

 

टॅग्स :Nagpur Winter Sessionनागपूर हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर