शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मी शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यासोबत; मी त्यांचाच शिवसैनिक : आमदार नितीन देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2022 13:27 IST

बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे आज गुवाहाटीहून नागपूरला परतले आहेत.

नागपूर : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सूरतमध्ये गेलेले बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख हे गुवाहाटीवरून नागपूरला परतले आहेत. नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना देशमुख म्हणाले, 'मला काहीही झाले नाही. गुजरात पोलिसांनी मला जबरदस्तीने इस्पितळात नेले. मी शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. मी त्यांचाच शिवसैनिक आहे'.

राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. त्यातच नॉट रिचेबल असलेले बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांच आज नागपूर विमानतळावर आगमन झालं. 

शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातील सुमारे ३० आमदारांसह बंडाचा झेंडा फडकावत सुरतमध्ये तळ ठोकला होता. यामध्ये अकाेला जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांचाही समावेश होता. दरम्यान, देशमुख यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी मंगळवारी पती बेपत्ता झाल्याची तक्रार सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात दाखल केल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

दरम्यान, देशमुख यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी सुरत येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. यानंतर आज त्यांच नागपूर विमानतळावर आगमन झालं. "मी उद्धव ठाकरेंसोबतच आहे आणि राहणार. मी परत आलो आहे आणि बाकीचेही येतील अशी खात्री मला आहे. मी तिथं आमच्या मंत्र्यांसोबत गेलो होतो. पण मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. मी सुखरुप परतलो आहे", अशी स्पष्टोक्ती आमदार नितीन देशमुख यांनी दिली. तर आता त्यांची पुढील भूमिका काय हे लवकरच स्पष्ट होईल. 

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Deshmukhनितीन देशमुखEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ