शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
2
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
3
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
4
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
5
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
6
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
7
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
8
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
9
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
10
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
11
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
12
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
13
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
14
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
15
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
16
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
17
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
18
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
19
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
20
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 

बजाज दाम्पत्यावरील खटल्याची सुनावणी मंगळवारपासून

By admin | Updated: September 4, 2016 03:03 IST

जरीपटका येथील महात्मा गांधी सेंटिनियल सिंधू हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. दीपक खुबचंद बजाज

कोट्यवधीच्या अपसंपदेचे प्रकरण : पहिल्या दिवशी तिघांची साक्ष तपासणारनागपूर : जरीपटका येथील महात्मा गांधी सेंटिनियल सिंधू हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. दीपक खुबचंद बजाज आणि त्यांच्या पत्नी वीणा दीपक बजाज यांच्याविरुद्धच्या कोट्यवधीच्या अपसंपदेच्या खटल्याच्या सुनावणीस मंगळवार ६ सप्टेंबरपासून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयात प्रारंभ होत आहे. या खटल्यात १५० हून अधिक साक्षीदार असून पहिल्याच दिवशी तीन साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)अब्जावधीच्या व्यवहाराच्या चिठ्ठ्यादीपक बजाज यांच्या घरझडतीत त्यांच्या बेडरूममध्ये त्यांच्या स्वत:च्या हस्ताक्षरात २६ चिठ्ठ्या आढळून आल्या होत्या. त्यावर बजाज यांनी दुसऱ्या व्यक्तींना व्याजाने दिलेल्या रकमांचा उल्लेख होता. ही रक्कम ३ अब्ज ९७ कोटी १६ लाख २७ हजार २९७ एवढी होती. बेडरुममधूनच ९७ वस्तू खरेदी केल्याच्या पावत्या आढळून आल्या होत्या. त्यांची किंमत १० कोटी ५७ लाख ५१ हजार ६९ रुपये होती. सर्व ११७ चिठ्ठ्यांमधील एकूण रक्कम ४ अब्ज ७ कोटी ७३ लाख ७८ हजार ३६६ एवढी होती.बजाज यांचा ‘चेहरा’दीपक बजाज यांनी ‘चेहरा’ या नावाचा चित्रपट निर्माण केलेला आहे. या चित्रपटाचे ते स्वत: निर्देशक असून त्यांची पत्नी वीणा बजाज या निर्मात्या आहेत. या चित्रपटावर त्यांनी तीन कोटी रुपये खर्च केलेले आहे. बजाज यांनी मुलीच्या लग्नात अमाप पैसा खर्च केलेला आहे.न्यायालयात सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे आणि सहायक सरकारी वकील गिरीश दुबे हे हा खटला चालविणार आहेत. दीपक बजाज लोकसेवकचमहात्मा गांधी सेंटिनियल हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून दीपक बजाज हे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून मासिक ७६ हजार ७३३ रुपये पगार घेतात. त्यामुळे ते भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम २ (क) (१) प्रमाणे लोकसेवक आहेत. ते आपल्या पदाचा दुरुपयोग करून सिंधू एज्युकेशन सोसायटीअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून अनेक वर्षांपासून विविध स्वरूपाची शुल्क आकारणी करून स्वत:चा व कुटुंबाचा आर्थिक फायदा करून घेत होते. सर्व शाळांमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याकरिता मोठ्या प्रमाणावर देणगीच्या स्वरूपात लाच घेत होते. तसेच शासनाकडून मदतीच्या स्वरूपात विविध अनुदाने स्वीकारून त्याचा उपयोग स्वत:च्या कुटुंबाकरिता करीत होते. बजाज अद्यापही कारागृहातप्रारंभी वीणा बजाज यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्या गेल्यानंतर त्यांना ६ आॅक्टोबर २०१५ रोजी अटक करण्यात आली होती. आता त्या जामिनावर आहेत. तर मुख्य आरोपी डॉ. दीपक बजाज यांना १२ नोव्हेंबर २०१५ रोजी अटक करण्यात आली होती. अद्यापही ते कारागृहात आहेत. दाम्पत्याविरुद्धचे आरोपपत्रलाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांनी तपास पूर्ण करून दीपक बजाज आणि त्यांच्या पत्नी वीणा दीपक बजाज यांच्याविरुद्ध ८ फेब्रुवारी २०१६ रोजी आरोपपत्र दाखल केले. २६ जुलै २०१६ रोजी त्यांच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले.