शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बहुजनांनो सत्तेची चाबी हाती घ्या : बसपा प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 21:41 IST

कांशीरामजी यांची चळवळ पूर्णत्वास न्यायची असेल तर महाराष्ट्रात व देशात बसपाचे सरकार स्थापन करा, सत्तेची चाबी आपल्या हाती घ्या. ज्या दिवशी सत्तेची ही मास्टर चाबी आपल्या हाती येईल व बहुजन समाज सत्ताधारी बनेल तेव्हाच खऱ्या अर्थाने मान्यवर कांशीरामजी यांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन बहुजन समाज पार्टीचे प्र्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी येथे केले.

ठळक मुद्देबहुजन समाज दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कांशीरामजी यांची चळवळ पूर्णत्वास न्यायची असेल तर महाराष्ट्रात व देशात बसपाचे सरकार स्थापन करा, सत्तेची चाबी आपल्या हाती घ्या. ज्या दिवशी सत्तेची ही मास्टर चाबी आपल्या हाती येईल व बहुजन समाज सत्ताधारी बनेल तेव्हाच खऱ्या अर्थाने मान्यवर कांशीरामजी यांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन बहुजन समाज पार्टीचे प्र्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी येथे केले.बसपा, बामसेफ, डीएसफोरचे संस्थापक कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त बसपा नागपूर विभागातर्फे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात गुरुवारी संघटन समीक्षा व बहुजन समाज दिवस समारोह आयोजित करण्यात आला होता. तेव्हा मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी प्रदेश प्रभारी अ‍ॅड. संदीप ताजने, प्रदेश उपाध्यक्ष कृष्णाजी बेले, प्रदेश महासचिव जितेंद्र म्हैसकर विशेष अतिथी होते.प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे म्हणाले, कांशीराम यांनी आपल्या आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्रातून केली. फुले-शाहू-आंबेडकर व तमाम मानवतावादी महापुरुषांचे स्वप्न साकार करणे हेच त्यांचे ध्येय व उद्दिष्ट होते. याच ध्येयाने झपाटलेल्या कांशीराम यांनी उत्तर प्रदेशात जाऊन बसपाची सत्ता स्थापन केली. मायावतींसारखी एका दलित महिला देशाच्या सर्वात मोठ्या राज्याची मुख्यमंत्री बनू शकते हे निराश व हताश झालेल्या शोषित-पीडित-बहुजन समाजाला त्यांनी दाखवून दिले. २०१९ मध्ये देखील केंद्रात बसपाची सत्ता येईल व मायावती पंतप्रधान होतील, असा विश्वाससुद्धा सुरेश साखरे यांनी व्यक्त केला.यावेळी कृष्णाजी बेले, जितेंद्र म्हैसकर, प्रा. पी.एस. चंगोले, राजकुमार शेंडे, चेतन पवार, मंगेश ठाकरे, बाळासाहेब गावंडे, अरविंद माळी, इंजी. दादाराव उईके यांनीही कांशीराम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर यांनी केले. संचालन पृथ्वीराज शेंडे यांनी केले. रुपेश बागेश्वर यांनी आभार मानले.मजबूत संघटनेशिवाय विजय अशक्यअ‍ॅड. संदीप ताजने यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. संघटना बांधणी झाली परंतु प्रामाणिकपणे संघटनेची काळजी घेतली जात नाही. अनेक पदाधिकारी केवळ कागदोपत्री आहेत. त्यांना कामाला लावण्याची गरज आहे. संघटना मजबूत नसेल तर विजय अशक्य आहे. तेव्हा संघटना मजबूत करा. संघटनेची प्रामाणिकपणे बांधणी झाल्यास किमान २० आमदार सहज निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीnagpurनागपूर