शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून पुढचे चार दिवस अवकाळीचा जाेर अधिक

By निशांत वानखेडे | Updated: May 11, 2024 16:22 IST

पुन्हा आठवडाभर राहिल पावसाचे सावट : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही प्रभाव

नागपूर : गुरुवारच्या धुमाकुळानंतर दाेन दिवस शांत राहिलेला अवकाळीचा पाऊस पुन्हा सक्रिय हाेण्याची स्थिती आहे. विदर्भात शनिवारपासून ते पुढचे चार दिवस १४ मे पर्यंत वादळ व विजांसह पावसाची तीव्रता अधिक राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने दिला आहे. त्यापुढचे चार दिवसही ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता वर्तविली आहे.

उत्तरप्रदेच्या मध्य क्षेत्रात समुद्र सपाटीपासून दीड किमी उंचीवर चक्रिया वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. या चक्रिय वारा क्षेत्रापासून दक्षिण आसामच्या हाॅफलाॅंग ते सिल्चरपर्यंत ९०० मीटर उंचावर पूर्व-पश्चिम पसरलेला हवेचा कमी दाबाचा आस तयार झाला आहे. दाेन्ही समुद्रातून हाेणारा बाष्प पुरवठा आणि मराठवाडा ते कन्याकुमारीपर्यंत तयार झालेली वारा खंडितता स्थिती यामुळे महाराष्ट्रात अवकाळी व गारपीटीचे वातावरण तयार झाले आहे.११ मे पासून १४ मे पर्यंत विदर्भ, मराठवाडा, खांदेश व पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जाेर अधिक राहणार आहे. नागपूरसह गडचिराेली, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गाेंदिया या जिल्ह्यात वादळ, गारपीटीसह पाऊस अधिक सक्रिय असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अवकाळीपासून अलिप्त असलेला मुंबई, उपनगरसह संपूर्ण कोकणातील सात जिल्ह्यातही १६ मेपर्यंत ढगाळ वातावरण राहून अगदीच तूरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवत आहे.

पारा चढला पण उष्णता कमीदाेन दिवसाची उसंत घेतल्यामुळे कमाल तापमानात थाेडी वाढ झाली आहे. गाेंदियात ७ अंश, ब्रम्हपुरीत ६.८ अंश, वर्धा ५.४ अंश वाढले. नागपुरात तापमान ३६.६ अंशावर वाढले. मात्र अद्याप सरासरीपेक्षा ५.८ अंशाने खाली आहे. नागपूरसह पावसाळी सावट असलेल्या जिल्ह्यात उन्हाची तीव्रता घटली असून उष्णताेसुद्धा कमी झाली आहे. अकाेला, अमरावती, वर्धा, वाशिम या जिल्ह्यात पारा ४० पेक्षा अधिक आहे.

टॅग्स :nagpurनागपूरweatherहवामान