शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

त्यांचे वाहन व रस्ते ठरले यमदूत, दुचाकी घसरून दोघांचा मृत्यू

By योगेश पांडे | Updated: July 11, 2024 16:05 IST

Nagpur : नागपुरमध्ये दोन नागरिकांचा वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी घसरून मृत्यू

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जागोजागी सुरू असलेल्या विकासकामांमुळे माती साचल्याने सिमेंट रस्ते निसरडे झाले आहे. अशा रस्त्यांवरून जाताना गाडी घसरण्याचा मोठा धोका असतो. नागपुरातील दोन नागरिकांचा वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी घसरून पडल्याने मृत्यू झाला. त्यांच्यासाठी त्यांचे वाहनच यमदूत ठरले असले तरी रस्त्यांचा निसरडेपणा हेदेखील एक कारण मानले जात आहे.

पहिला अपघात अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. प्रदीप किरण दिंडमुढे (४५, विश्वकर्मा नगर) हे त्यांच्या दुचाकीने कांबळे चौकातून जात होते. पाऊस सुरू असल्याने रस्ता निसरडा झाला होता व त्यांची दुचाकी स्लीप होऊन ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला मार लागला व ते गंभीर जखमी झाला. त्यांना सक्करदरा येथील एका खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा १० जुलै रोजी मृत्यू झाला. निखील पसारे यांच्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुसरी घटना सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. शोहेब बरकाती शेख (२६, निराला सोसायटी, सक्करदरा) हे ९ जुलै रोजी साडेसात वाजता सक्करदरा उड्डाणपुलाजवळून जात होते. त्यांची दुचाकी स्लीप झाली व ते खाली पडले. त्यांना जखमी अवस्थेत अगोदर मेडिकल व नंतर खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. १० जुलै रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सक्करदरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विकासकामांमुळे हजारो वाहनचालकांना धोकाशहरात जागोजागी रस्त्यांची तसेच पाईपलाईन टाकण्याची कामे सुरू आहेत. बऱ्याच ठिकाणी खाजगी बिल्डर्सचे डम्पर मातीचा मलबा घेऊन जाताना दिसतात. त्यांच्या टायर्सला लागलेली मातीची ठिगळे रस्त्यावर पडतात व सिमेंट रस्ते निसरडे होत असल्याचे चित्र आहे. त्यावरून जाताना दुचाकीचालक घसरून पडतात. शहरात अशोक चौक, जगनाडे चौक, भेंडे ले आऊट, प्रतापनगर रिंग रोड, ऑरेंज स्ट्रीट येथे हे चित्र दिसून येत आहे. मात्र प्रशासनाकडून कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याचा फटका दुचाकीस्वारांना बसतो आहे.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर