शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती महिलांसह पोटातील बाळावरही रंगांचे वाईट परिणाम, डॉ. अविनाश गावंडे यांनी व्यक्त केली भीती

By सुमेध वाघमार | Updated: March 23, 2024 19:14 IST

Nagpur News: वाईट प्रवृत्तीवर मात करणारा, शत्रूलाही मित्र बनविणारा, कटूता संपविणारा, रंगाची उधळण करून सर्वांना एकत्र आणणारा सण म्हणजे होळी. परंतु रसायनयुक्त रंग खेळल्यास गर्भवती महिलेसह तिच्या पोटातील बाळावरही वाईट परिणाम होऊ शकतो, असे मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक व बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांचे म्हणणे आहे. 

- सुमेध वाघमारे नागपूर - वाईट प्रवृत्तीवर मात करणारा, शत्रूलाही मित्र बनविणारा, कटूता संपविणारा, रंगाची उधळण करून सर्वांना एकत्र आणणारा सण म्हणजे होळी. परंतु रसायनयुक्त रंग खेळल्यास गर्भवती महिलेसह तिच्या पोटातील बाळावरही वाईट परिणाम होऊ शकतो, असे मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक व बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांचे म्हणणे आहे. 

लाल रंगात ‘मर्क्युरी सल्फेट’ डॉ. गावंडे यांनी सांगितले, धुळवडच्या दिवशी बहुतांश प्रमाणात लाल रंगाचा वापर होतो. हा रंग ‘मर्क्युरी सल्फेट’पासून तयार होतो. यामुळे त्वचेचे आजार, कर्करोग होऊ शकतो. काही प्रकरणांत तर अर्धांगवायूचा झटकाही आल्याचे पुढे आले आहे.

जांभळ्या रंगात ‘क्रोमिअम’ आणि ‘ब्रोमाइट’जांभळा रंग ‘क्रोमिअम’ आणि ‘ब्रोमाइट’पासून तयार होतो. हिरवा रंग ‘कॉपर सल्फेट’पासून तयार केला जातो. तो वापरल्यास त्वचेची जळजळ होते. डोळ्यात रंग गेल्यास ते निकामी होण्याची भिती असते. अ‍ॅलर्जी होऊन डोळे लाल होतात. 

काळ्या रंगात ‘लेड आॅक्साइड’काळा रंग हा ‘लेड आॅक्साइड’ पासून तयार होतो. म्हणजे, रंग कुठलाही घ्या, त्यात जीवघेणे रासायनिक पदार्थ राहतातच. मुले जेव्हा रंगउधळण करतात, तेव्हा त्यांच्या नाका-तोंडात, कानात, डोळ्यात रंग जातोच. काळा रंग एवढा घातक आहे की, त्यामुळे त्वचेचे आजार तर होतातच, पण किडनीविकारही होतात. 

बाळ गतिमंद जन्माला येऊ शकतेकाळ्या रंगातील रसायनामुळे जन्माला येणारे बाळ गतिमंद राहू शकते. यामुळे गर्भवतींनी विशेष काळजी घ्यायला हवी. या शिवाय, रंग लावताना बचावासाठी अनेकजण सैरावैरा धावतात, झटापट होते. त्यातून पढण्याचा, अपघाताचा धोका संभावतो. 

रंगासाठी पळसाची फुले, हळद, मेहंदीचा करा वापर होळी नैसर्गिक रंगांचा वापर करूनच खेळा. पळसाची फुले, हळद, मेहंदी, बीट रूटचा वापर करून पिवळा रंग तयार करता येतो. याशिवाय हिरवा रंग तयार करयचा असल्यास कोथींबीर, पालक, पुदीना, टोमॅटोची पाने याची पेस्ट करा. ती पाण्यात टाका व दोन चमचे मेंदी टाकून एक लिटर पाण्यात उकळून घ्या. यातूनच हिरवा रंग तयार होतो. होळी वाईटावर मात करणारा सण आहे. तो विकार विकत घेणारा सण नाही, असेही डॉ. गावंडे म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरHoliहोळी 2024