शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपात मागासवर्गीयांच्या निधीची पळवापळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:02 IST

आर्थिकदृष्ट्या मागास वसाहतीतील लोकांचे जीवनमान उंचवावे यासाठी मागास घटकांची लोकसंख्या अधिक असलेल्या वस्त्यात रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, उद्यान निर्मिती, पथदिवे व शौचालय अशा मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या ५ टक्के निधी हा मागासवर्गीयासाठी राखीव ठेवला. जातो. नियमानुसार लोकसंख्येच्या ६० टक्के मागासवर्गीयांची संख्या असलेल्या भागातच हा निधी खर्च करणे अपेक्षित आहे. मात्र मागील काही वर्षात मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीची पळवापळवी सुरू आहे.

ठळक मुद्देकसा होणार दुर्बल घटकांचा विकास : मागासवर्गीय नसलेल्या वस्त्यांत खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्थिकदृष्ट्या मागास वसाहतीतील लोकांचे जीवनमान उंचवावे यासाठी मागास घटकांची लोकसंख्या अधिक असलेल्या वस्त्यात रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, उद्यान निर्मिती, पथदिवे व शौचालय अशा मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या ५ टक्के निधी हा मागासवर्गीयासाठी राखीव ठेवला. जातो. नियमानुसार लोकसंख्येच्या ६० टक्के मागासवर्गीयांची संख्या असलेल्या भागातच हा निधी खर्च करणे अपेक्षित आहे. मात्र मागील काही वर्षात मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीची पळवापळवी सुरू आहे.२०११ च्या जनगणनेनुसार नागपूर शहराची लोकसंख्या २४ लाख ५ हजार ४२१ इतकी होती. यात ३९.४० टक्के लोकसंख्या दुर्बल घटकांची होती. आता शहरातील लोकसंख्येचा आकडा ३० लाखांच्या पुढे गेला आहे. म्हणजेच शहरात मागासवर्गीयांची लोकसंख्या दहा लाखाहून अधिक आहे. याचा विचार करता या भागात मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध होण्याची गरज आहे. परंतु महापालिकेतील पदाधिकारी व वजनदार नगरसेवक मागासर्गीयांचा निधी अन्य भागातील विकास कामावर खर्च करीत आहेत. विशेष म्हणजे यात काही पदाधिकाऱ्यांच्या वस्त्यांचाही समावेश आहे.मागासवर्गीयांच्या राखीव निधीतून अशा वस्त्यात भूमिगत नाल्या, रस्ते, पाणी, शौचालय, प्राथमिक व माध्यमिक शाळा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सवलती, उद्यान निर्मिती, समाज मंदिर, पथदिवे, दुर्बल घटकांसाठी घरकु लांचे बांधकाम अशा स्वरुपाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध होणे अपेक्षित आहे. मात्र ज्या भागात मागासवर्गीयांची संख्या कमी असलेल्या भागात हा निधी खर्च होत असल्याचा मागावर्गीय भागातील नगरसेवकांचा आरोप आहे.आर्थिक तंगीचा फटकामहापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने आयुक्तांनी विकास कामांच्या फाईल मंजुरीवर निर्बंध घातले आहे. तसेच उपलब्ध निधीनुसार मूलभूत सुविधांची कामे केली जात आहे. वास्तविक अर्थसंकल्पाच्या ५ टक्के निधी हा दुर्बल घटकांवर खर्च करणे बंधनकारक आहे. परंतु नियम व निकष धाब्यावर बसवून मागासवर्गीयांच्या निधीची पळवापळवी सुरू आहे. याला आळा घालण्याची गरज आहे.मागासवर्गीयावर अन्यायमहापालिकेच्या अर्थसंकल्पात प्राप्त महसुलाच्या पाच टक्के निधी हा दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवला जातो. यातून दुर्बल घटकांची लोकसंख्या ६० टक्केहून अधिक असलेल्या भागात हा निधी खर्च करणे अपेक्षित आहे. परंतु ज्या भागात दुर्बल घटकांची लोकसंख्या फारशी नाही अशा भागात हा निधी खर्च केला जात आहे. तसेच अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. परंतु हा संपूर्ण निधी खर्च केला जात नाही. हा मागासवर्गीयावर अन्याय असून याला प्रशासनाने आळा घालावा, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी केली आहे.मागील चार वर्षात दुर्बल घटकांसाठी केलेली तरतूदवर्ष              तरतूद (कोटी)२०१५-१६   ८९.३९२०१६-१७   ६०. २९२०१७-१८   २२.२६२०१८-१९   ५६.२६

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfundsनिधी