शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोग करणार सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:13 IST

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असल्याचा सत्ताधाऱ्यांकडून शुक्रवारी पुनरुच्चार करण्यात आला. न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका भक्कमपणे मांडता यावी, यासाठी सखोल अभ्यास सुरू आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यातील प्रत्येक पंचायत समितीतील दोन गावांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

ठळक मुद्देप्रत्येक पंचायत समितीतील दोन गावे निवडणारविरोधक-सत्ताधाऱ्यांत रंगला कलगीतुरा

योगेश पांडेआॅनलाईन लोकमतनागपूर : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असल्याचा सत्ताधाऱ्यांकडून शुक्रवारी पुनरुच्चार करण्यात आला. न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका भक्कमपणे मांडता यावी, यासाठी सखोल अभ्यास सुरू आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यातील प्रत्येक पंचायत समितीतील दोन गावांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात शरद रणपिसे, संजय दत्त, भाई जगताप इत्यादी सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. हा प्रश्न तसेच उपप्रश्नांची मालिका लांबली व प्रश्नोत्तराचा तास सुमारे पाऊण तास वाढवावा लागला. यादरम्यान, विरोधक व सत्ताधारी सदस्यांमध्ये शाब्दिक फैरीदेखील झडल्या.मराठा आरक्षणाची बाब न्यायप्रविष्ट आहे. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणाबाबत दस्तऐवज तपासून सखोल अहवाल सादर करण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाला कळविण्यात आले होते. याअंतर्गतच प्रत्येक पंचायत समितीतील दोन गावांचे सर्वेक्षण आयोगाकडून करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकात पाटील यांनी दिली. तसेच प्रत्येक जिल्ह्यात अण्णाभाऊ पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालयदेखील सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहमराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील व व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधण्यात येईल, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. यासंदर्भात जागादेखील उपलब्ध करून देण्यात येईल व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित असलेल्या व अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतींचादेखील विचार करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती , एक लाख रुपये उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्याला शहरात ३०, ग्रामीण भागात २० हजार रुपये राहण्याचा खर्च, जिल्हास्तरावर वसतिगृह प्रति विद्यार्थी दहा हजार रुपये अनुदान, या योजनादेखील जाहीर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनnagpurनागपूर