शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अधिकाऱ्यांचा बॅकलॉग : खरीपाचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 19:40 IST

खरीपाचा हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. अशात शेतकऱ्यांचा सातत्याने संपर्क येणाऱ्या कृषी विभागात पुरेसे अधिकारी नसल्याने संपूर्ण जिल्ह्याच्याच कारभाराची ‘माती’ झाल्याचे चित्र आहे़

ठळक मुद्देपेरणीच्या हंगामात अधिकाऱ्याविना मुख्यालय अन् पंचायत समित्याही रिकाम्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीपाचा हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. अशात शेतकऱ्यांचा सातत्याने संपर्क येणाऱ्या कृषी विभागात पुरेसे अधिकारी नसल्याने संपूर्ण जिल्ह्याच्याच कारभाराची ‘माती’ झाल्याचे चित्र आहे़ सहा पंचायत समित्यांमध्ये कृषी अधिकाऱ्यांसह विस्तार अधिकाऱ्यांची नऊ पदे रिक्त असल्याची आकडेवारी आहे़शासनाने ही पदे मागील काही वर्षांपासून भरली नाही़ परिणामी, जिल्हा परिषदेसह स्थानिक पंचायत समित्यांचा कृषी विभाग कसेतरी दिवस काढत आहे़ याचा फटका शेतकऱ्यांना मिळणाऱ्या थेट लाभावर पडला आहे़ योजनांची वेळेत आणि प्रभावी अंमलबजावणी थांबली आहे़ खरीप हंगाम अगदी तोंडावर आहे़ मृग नक्षत्र हे पेरणीचे नक्षत्र आहे़ त्यापूर्वी शेतकऱ्यांना बी-बियाणे, रासायनिक खते, पेरणीपूर्व साहित्य अनुदान तत्त्वावर देण्यात येते़ अधिकारीच नसल्याने हे साहित्य कुणामार्फत वाटावे, हा प्रश्न आहे़ जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचीही हीच अवस्था आहे़ येथे सांख्यिकी विस्तार अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी व कनिष्ठ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहे़ आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून एकाही विकास योजनांच्या फाईलला तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही़रिक्त पदांचा तपशील बघितल्यास, रामटेक पंचायत समितीमध्ये कृषी अधिकारी व कृषी विस्तार अधिकारी, कळमेश्वरमध्ये कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी, उमरेड पंचायत समितीत कृषी अधिकारी, कुही येथे विस्तार अधिकारी आणि भिवापूर पंचायतमध्ये कृषी अधिकारी व कृषी विस्तार अधिकारी तसेच कामठीमध्ये कृषी अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे़ याशिवाय, कामठीमध्ये मंडळ कृषी अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे़ त्याचबरोबर जि.प.च्या मुख्यालयातील कृषी विभागात मोहीम अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे. जिल्हा कृषी अधिकारी (सामान्य) एक पद रिक्त आहे. विशेष घटक योजना अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे. कनिष्ठ सहा. चे दोन पद रिक्त आहे. वरिष्ठ सहा. लेखाचे एक पद रिक्त आहे. जि.प.चे कृषी अधिकारी प्रवीण देशमुख यांचा अपघात झाल्याने ते सुटीवर आहे. अधिकाऱ्यांच्या रिक्तपदामुळे कृषीच्या योजना राबविण्यावर परिणाम होत आहे.ही शेतकऱ्यांप्रती उदासीनताच आहेहंगाम तोंडावर आहे. विभागात अधिकारी नाही. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून एकाही विकास योजनांच्या फाईलला तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही़ हंगामापूर्वी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभापासून ते वंचित राहतील. राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. अशात येथील शेतकरी हंगामाच्या तोंडावर उपेक्षित राहत असतील तर हे दुर्दैव आहे.मनोहर कुंभारे, विरोधी पक्षनेते, जि.प.

 

टॅग्स :Farmerशेतकरी