शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात  फॅमिली सलूनच्या आड वेश्याव्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 23:47 IST

फॅमिली सलूनच्या आड वेश्याव्यवसाय करणाऱ्या मनकापुरातील शालिनी लक्ष्मण कांबळे (वय ३६, रा. महेशनगर) तसेच तिचा साथीदार तुषार कन्हैया परसवाणी (वय २४) या दोघांना बुधवारी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमहिलेसह दोघांना अटक : तीन मुलींची सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फॅमिली सलूनच्या आड वेश्याव्यवसाय करणाऱ्या मनकापुरातील शालिनी लक्ष्मण कांबळे (वय ३६, रा. महेशनगर) तसेच तिचा साथीदार तुषार कन्हैया परसवाणी (वय २४) या दोघांना बुधवारी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून वेश्याव्यवसायात सक्रिय असलेल्या शालिनी कांबळेने स्वॉन फॅमिली सलून युनिसेक्स नावाने कुंटणखाना सुरू केला होता. त्यासाठी गोकुळपेठेतील लोटस बिल्डिंगमध्ये एक आलिशान सदनिका भाड्याने घेतली होती. सलूनमध्ये काम करणाºया मुलीला जास्त पैशाचे आमिष दाखवून ती त्यांच्याकडूनही वेश्याव्यवसाय करवून घेत होती. ही माहिती कळताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त संजीव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम गौड, मीना जगताप, उपनिरीक्षक स्मिता सोनवणे, दामोदर राजुरकर, सुभाष खेडकर, सुरेखा सांडेकर, शिपाई छाया राऊत, साधना चव्हाण, फोटोग्राफार बळीराम रेवतकर आणि त्यांच्या सहकाºयांनी कारवाईसाठी सापळा रचला. बुधवारी सायंकाळी परसवाणीच्या माध्यमातून कांबळेकडे बनावट ग्राहक पाठविण्यात आले. तिने रक्कम स्वीकारून वेश्याव्यवसाय करणारी तरुणी उपलब्ध करून देताच तिला ताब्यात घेण्यात आले. कांबळे आणि परसवाणीच्या तावडीतून तीन तरुणींची सुटका करण्यात आली असून, या दोघांविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटraidधाड