शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
2
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
3
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
4
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे
5
पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?
6
नारळ पाणी प्यायल्याने खरंच कमी होतं का वजन? डॉक्टरांनीच सांगितलं 'हे' सत्य
7
सुवर्णसंधी! एनएचपीसीमध्ये विविध पदांसाठी भरती; २ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात
8
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५ वर्षांत मिळवा ५ लाख रुपये व्याज! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक
9
Video: दोन सिंहांमध्ये जुंपली... तुफान भांडण, एकमेकांवर हल्ले... पाहा कोण कुणावर भारी?
10
Ganpati Visarjan 2025: बाप्पाचे विसर्जन करताना जगबुडी नदीचे पाणी वाढले अन् तिघे गेले वाहून
11
उत्तराखंडमध्ये पुन्हा आभाळ फाटले, दोन ठिकाणी ढगफुटी, 10 जण ढिगाऱ्याखाली; दोन जखमी
12
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला सरकारचे सहकार्य: देवेंद्र फडणवीस
13
लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलावे? सोपी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया जाणून घ्या
14
मुकेश अंबानींनी केली नव्या कंपनीची घोषणा...! आता कोणता बिझनेस करणार? जाणून घ्या
15
Maratha Morcha Mumbai: आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले
16
मध्य प्रदेशातून बेपत्ता झालेली निकिता पंजाबमध्ये सापडली; पळून जाऊन बॉयफ्रेंडशी केलं लग्न
17
थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांना मोठा धक्का; कोर्टाने लीक फोन कॉल प्रकरणात ठरवलं दोषी
18
पाकिस्तानला शह देण्यासाठी भारताची नवी खेळी; सौदी अरेबियाला संरक्षण क्षेत्रात दिली मोठी ऑफर
19
'भारताने पाणी सोडले म्हणून मृतदेह वाहत आले...', पाकिस्तानी मंत्र्याने पुन्हा गरळ ओकली
20
त्याने BMW थांबवली, मला म्हणाला गाडीत बस अन्...; नम्रता संभेरावने सांगितला बॉलिवूड अभिनेत्याचा 'तो' किस्सा

बाबासाहेबांचे क्रांती विज्ञान समाजात पेरा : ताराचंद खांडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 01:40 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतावाद जागतिक पातळीवर पोहोचविला. महाडचा सत्याग्रह, संविधान निर्मिती आणि धम्मदीक्षेचे क्रांतिशास्त्र हे सर्व मानव कल्याणासाठी होते. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या या विचारांचे क्रांतिविज्ञान समाजात पेरा, असे आवाहन प्रसिद्ध विचारवंत ताराचंद खांडेकर यांनी केले.

ठळक मुद्दे संविधान मुव्हमेंटचा वर्धापन दिन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतावाद जागतिक पातळीवर पोहोचविला. महाडचा सत्याग्रह, संविधान निर्मिती आणि धम्मदीक्षेचे क्रांतिशास्त्र हे सर्व मानव कल्याणासाठी होते. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या या विचारांचे क्रांतिविज्ञान समाजात पेरा, असे आवाहन प्रसिद्ध विचारवंत ताराचंद खांडेकर यांनी केले. रिपब्लिकन मुव्हमेंट या साप्ताहिकाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित दिवसभराच्या वैचारिक मंथन कार्यक्रमाचे समारोप करताना ते बोलत होते. उर्वेला कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांनी ‘गेल्या साठ वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीला आम्ही कोणत्या स्तरावर घेऊन आलो आहोत आणि आमची जबाबदारी काय याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी खंत व्यक्त केली. पहिल्या सत्रात पुण्याचे धर्मराज निमसरकार, का. रा. वालदेकर, बुलडाण्याचे सुरेश साबळे, उस्मानाबादच्या अस्मिता मेश्राम, डॉ. सविता कांबळे, धम्मचारी पद्मबोधी यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. धम्मचारी पद्मबोधी यांनी ‘आंबेडकरी चळवळ म्हणजे नेमके काय, आंबेडकरी चळवळीचे धयेय काय, आणि ते गाठण्यासाठी साधने कोणती, असे प्रश्न उभे करीत ध्येय स्पष्ट नसेल तर आंदोलन भरकटत जाते, आंदोलन दिशाहीन होते, याकडे लक्ष वेधले. यावेळी ज्येष्ठ चित्रकार अरुण मोटघरे, प्राचार्य भाऊ वासनिक, डॉ. राजाभाऊ टाकसाळे, अशोक सरस्वती, संजय शेंडे, प्रा. रमेश राठोड, पल्लवी जीवनतारे, अनिकेत कुत्तरमारे, सिद्धांत पाटील, शितल गडलिंग, आणि प्रशांत बेले यांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक संपादक नरेश वाहणे यांनी केले. संचालन कवी संजय गोडघाटे व शीतल गडलिंग यांनी केले. विलास भोंगाडे यांनी आभार मानले.बॉक्स..लोकशाही वाचवणे ही काळाची गरजदेशात अराजकतेचे वातावरण आहे. धर्मसत्तेचा सरकारवर अंकुश आल्याने लोकशाही धोक्यात आली आहे. तेव्हा लोकशाही वाचवणे ही काळाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ कवी इ.मो.नारनवरे यांनी यावेळी दुसऱ्या सत्रातील मुक्तचर्चेत व्यक्त केले. आर्किटेक्ट नरेंद्र शेलार यांनी प्राक्कथन केले. अस्मिता मेश्राम, सुरेश साबळे, विजय बौद्ध, पल्लवी जिवनतारे, मयूर रंगारी, प्रशांत बेले, अशोक सरस्वती, अशोक मस्के, सुधीर भगत, हरीश नागदेवे, सिद्धांत पाटील, भीमराव गणवीर आदींनी भाग घेतला.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरConstitution Dayसंविधान दिन