शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाचा स्तुत्य उपक्रम : १० हजार मुलांना फूटपाथवर अ, आ, ई चे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 12:33 IST

नागपुरात महाराजबाग राेडवर खेळणी विकणाऱ्यांच्या मुलांसाठी पहिली फूटपाथ शाळा सुरू झाली. व त्यानंतर हळू-हळू ११ फूटपाथ स्कूल शहरात सुरू झाले. या शाळांमधून १२ वर्षांत ११ हजार मुले शिकून निघून गेली. काही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत, काही उच्च शिक्षणापर्यंत पाेहोचली व काही नाेकरीवरही लागली. तर, काही खेळांमध्ये उल्लेखनीय ठरली आहेत.

ठळक मुद्दे‘उपाय’चा १२ वर्षांचा प्रवास; देशभरात रुजविली ‘फूटपाथ स्कूल’ची संकल्पना

निशांत वानखेडे

नागपूर : ‘आपण किती जगलाे यापेक्षा कसे जगलाे आणि जाताना जगाला काय देऊन गेलाे’, हे जास्त महत्त्वाचे आहे. ‘उपाय’ संस्थेने नुकताच १२ वा स्थापना दिवस साजरा केला. फूटपाथवर वाढलेल्या, जगलेल्या, शाळेची इमारतही न पाहिलेल्या निरागस मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धडपडण्याचा ताे वर्धापन दिन हाेय. नागपूर जिल्ह्यातील माैद्यात सुरू झालेल्या फूटपाथ स्कूलचे राेपटे देशभरात रुजविण्याचा आणि ११००० मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात नेण्याचा हा प्रवास आहे. ताे जेवढा अतुलनीय तेवढाच मानवीयही आहे.

एनटीपीसी माैदा येथे सेवारत अभियंता वरुण श्रीवास्तव यांना शाळेत न जाता भटकणाऱ्या मुलांना पाहून काहीतरी करण्याची इच्छा झाली. काेण काय म्हणेल, असा मागचा-पुढचा विचार न करता त्यांनी त्यांच्या घरापर्यंत जाऊन शिकविणे सुरू केले. त्यांचे अनुकरण करून काही संवेदनशील तरुण त्यांच्याशी जुळले आणि नागपुरात महाराजबाग राेडवर खेळणी विकणाऱ्यांच्या मुलांसाठी पहिली फूटपाथ शाळा सुरू झाली. महाविद्यालयीन, नाेकरीपेशा तरुण येथे सायंकाळी येऊ लागले आणि या मुलांसाेबत वेळ घालवून त्यांना अ, आ, ई चे धडे देऊ लागले. पाहता-पाहता तरुण जुळत गेले. मग माऊंट राेड, पागलखाना चाैक, सक्करदरा, वर्धमाननगर, लक्ष्मीनगर असे एक-एक करीत ११ फूटपाथ स्कूल शहरात सुरू झाले. शिक्षण फूटपाथपर्यंत या मुलांना शाळांपर्यंत पाेहोचविण्याचे कामही या तरुणांनी केले. या काळात वरुण यांच्या शिकविण्याने १० वीपर्यंत गेलेल्या मुलांनी त्यांच्या गावी शाळा सुरू केल्या. असे ११ सेंटर माैद्याच्या आसपासच्या गावात आज सुरू आहेत.

ही शाळा नागपूरपुरती मर्यादित राहिली नाही. पुण्यातील तरुणांनी ‘उपाय’शी जुळून तेथे केंद्र सुरू केले. पुढे गुडगाव, बंगलोर, दिल्ली व आता मध्यप्रदेशच्या गादरबारा येथे फूटपाथ शाळा सुरू झाली. असे ४० केंद्र आज देशात कार्यरत असून २५० च्यावर स्वयंसेवक मुलांना शिकविण्याचे काम करतात. या फूटपाथ शाळांमधून १२ वर्षांत ११ हजार मुले शिकून निघून गेली. काही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत, काही उच्च शिक्षणापर्यंत पाेहोचली व काही नाेकरीवरही लागली. काही खेळांमध्ये उल्लेखनीय ठरली आहेत.

काेराेना काळातही सेवा

काेराेनाकाळात ‘उपाय’च्या कार्यकर्त्यांनी ३५ हजार लाेकांना अन्नधान्य पुरवठा केला. ६०० लाेकांचे लसीकरण केले. ७३० लाेकांना वैद्यकीय सुविधा पुरविली. १० ऑक्सिजन सहायता केंद्र चालविले

देशात आठ दशलक्ष मुले शाळेच्या बाहेर समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. कुणीतरी जबाबदारी घेतली तर एक-एक मुलगा शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकताे. ही मुले शाळेत जाऊ शकत नाही तर शाळा त्यांच्यापर्यंत पाेहोचविता येते. थाेडा विचार करून या निरागस मुलांसाठीही वेळ काढायला हवा.

- वरुण श्रीवास्तव, संस्थापक, ‘उपाय’

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी