शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यमान भारत योजना ठरतेय फसवी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 11:03 IST

नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या ४७ लाखांवर गेली असताना केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आयुष्यमान भारत या योजनेंतर्गत पंतप्रधान राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानामध्ये केवळ ३ लाख ७७ हजार ३०१ लाभार्थी कुटुंबीयांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२०६ गावांमध्ये शून्य लाभार्थी४७ लाख लोकसंख्येत केवळ ४ लाख पात्र कुटुंब

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागूपर : नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या ४७ लाखांवर गेली असताना केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आयुष्यमान भारत या योजनेंतर्गत पंतप्रधान राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानामध्ये केवळ ३ लाख ७७ हजार ३०१ लाभार्थी कुटुंबीयांची निवड करण्यात आली आहे. यातही २०६ गावांमध्ये शून्य लाभार्थी अशी नोंद आहे. यामुळे पात्र कुटुंबीयांमध्ये रोष व्याप्त असून ही योजना फसवी असल्याचा आरोप केला जात आहे.केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत एका कुटुंबाला पाच लाख रुपये विमा संरक्षण मिळणार आहे. यात कोणत्याही आजारावर देशभरातील नामांकित रुग्णालयात लाभार्थी कुटुंबातील व्यक्तींना उपचार घेता येणार आहे. २०११ मध्ये झालेले सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणानुसार लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. यात ज्या कुटुंबाचे एक लाखाच्या आत उत्पन्न आहे अशाच कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीनुसार आरोग्य विभागाने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पात्र कुटुंबातील व्यक्तींचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, कुटुंबाची माहिती संकलित करण्याचे कार्य मे २०१८ पासून सुरू केले आहे. परंतु अनेक पात्र कुटुंबीयांची नावे यादीत नसल्याने गोंधळ उडाला आहे. यादीत शहरी भागातील महानगरपालिका, नगर पंचायत, नगर परिषद मिळून ३२८ वॉर्डांचा समावेश केला असून, पात्र कुटुंबीयांची संख्या २ लाख ३९८ दर्शविण्यात आली आहे, तर ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या १८९१ गावेच यादीत समाविष्ट आहेत. यातील फक्त १ लाख ७६ हजार ९०३ कुटुंबीय पात्र ठरविण्यात आली आहेत. याच कुटुंबातील पाच व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामुळे उर्वरित नागपूर जिल्ह्यातील ४३ लाख लोकसंख्येमध्ये कुणी गरीब नाही का, प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न एक लाखावर आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शहरात लाभार्थी कुटुंब ७ टक्केच२०११ च्या सर्वेक्षणानुसार तयार करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत नागपूर शहरातील १३५ वॉर्डातून केवळ १ लाख ७६ हजार १०३ कुटुंबीयांची निवड करण्यात आली आहे. २५ लाख लोकसंख्येत केवळ या ७ टक्केच पात्र कुटुंबीयांना देशातील दीड लाख सर्व सुविधा असलेल्या रुग्णालयांचा लाभ मिळणार आहे.

खेड्यात फक्त १ लाख ७६ हजार गरीब कुटुंबआयुष्यमान योजनेच्या यादीत नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतअंतर्गत १८९१ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यात १ लाख ७६ हजार ९०३ पात्र कुटुंब आहेत. उर्वरित २०६ गावांमध्ये गरीब कुटुंबच नसल्याने त्या गावाचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. ही गावे जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोपही होत आहे.

टॅग्स :Healthआरोग्य