शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘सीएससी’मध्येही आयुष्यमान भारतचे ई-कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 11:43 IST

केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘आयुष्यमान भारत’ची सुरुवात झाली असली तरी योजनेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे वास्तव आहे. यामुळे याची व्याप्ती वाढविण्यासाठी शासनाने आता ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ला (सीएससी) हाताशी घेतले आहे.

ठळक मुद्देव्याप्ती वाढविणारमेयो, मेडिकल, सुपर व डागात मिळत होते ‘ई-कार्ड’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘आयुष्यमान भारत’ची सुरुवात झाली असली तरी योजनेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे वास्तव आहे. यामुळे याची व्याप्ती वाढविण्यासाठी शासनाने आता ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ला (सीएससी) हाताशी घेतले आहे. चंद्रपूर व नाशिकनंतर नागपूर जिल्ह्यातील या केंद्रांना ‘आयुष्यमान भारत’ योजनेचे ‘ई-कार्ड’ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे लोकार्पण झाल्यापासून नागपूर जिल्ह्यात योजनेचे ‘ई-कार्ड’ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) , सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातून उपलब्ध करून दिले जात होते. परंतु आता या योजनेच्या ‘ई-कार्ड’साठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’, म्हणजेच ‘सीएससी’लाही मंजुरी देण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात असे ८५० केंदे्र आहेत तर, शहरात ३०० केंदे्र आहेत. केवळ ३० रुपयांमध्ये या योजनेचे ‘ई-कार्ड’ उपलब्ध करून दिले जाणार आहे.यादीत नाव असणाऱ्यांनाच मिळणार ई-कार्ड‘आयुष्यमान भारत’ योजनेच्या यादीत नाव असणाºयांनाच ‘ई-कार्ड’ मिळणार आहे. यासाठी अधिकृत ‘सीएससी’ सेंटरमध्ये नागरिक गेल्यावर त्याच्या नावाची तपासणी केली जाईल. यादीत नाव असल्यास ‘ई-कार्ड’च्या मंजुरीसाठी पाठविले जाईल. २४ तासांत मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित नागरिकाला हे ओळखपत्र मिळेल. नागपुरात गेल्या चार दिवसांपासून याला सुरुवात झाली असून लोकांचा प्रतिसाद मिळत आहे.कुणाला मिळणार लाभया योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला वर्षातून एकदा पाच लाख रुपये विमा संरक्षण मिळणार आहे. कोणत्याही आजारांवर देशभरातील नामांकित रुग्णालयात लाभार्थी कुटुंबातील व्यक्तींना उपचार घेता येणार आहे. २०११ मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणानुसार (एसईसीसी) लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. यात ज्या कुटुंबाचे एक लाखाच्या आत उत्पन्न आहे अशाच कुटुंबाचा समावेश करण्यात आला आहे. यात नागपूर जिल्ह्यातील ३ लाख ७७ हजार ३०१ लाभार्थी कुटुंबांचा समावेश आहे. याच कुटुंबातील पाच व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्यGovernmentसरकार