शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
6
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
7
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
8
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
9
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
10
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
11
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
12
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
13
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
14
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
15
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
16
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
17
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
18
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
19
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
20
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
Daily Top 2Weekly Top 5

विश्व में गुंजे हमारी भारती... संघ गीतांतून राष्ट्रभक्तीचा जागर; शंकर महादेवन यांचे गायन

By योगेश पांडे | Updated: September 28, 2025 23:35 IST

सरसंघचालकांच्या हस्ते संघगीत संग्रहाचे लोकार्पण

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त उत्साह असताना स्वयंसेवकांना रविवारी सायंकाळी संघगीतांची अवर्णनीय मेजवानीच मिळाली. संघगीत या संग्रहाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते रविवारी लोकार्पण झाले. प्रसिद्ध गायक व संगीतकार शंकर महादेवन यांच्या स्वरांतील हम करे राष्ट्र आराधन, बलसागर भारत होवो, विश्व में गुंजे हमारी भारती, निर्माणों को पावन युग में यासारख्या गीतांना ऐकून उपस्थित असलेले स्वयंसेवकांचे मन नकळतपणे शाखा मैदान व संघ वर्गातील आठवणींमध्ये गेले.

रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल सोले हे प्रामुख्याने उपस्थित होते. संगीत आणि शब्द हे भावनेचे वाहक आहेत. उत्तम शब्द थेट हृदयाला भेटतात आणि त्याला संगीताची जोड असल्यास त्याचे ग्रहण अधिक गतिशील त्याने होते. संघ गीतातील शब्दांच्या मागे जीवनाची तपस्या आहे. या गीतांच्या रचनाकरांची नोंद नसली तरीही राष्ट्रभक्तीची भावना समान असते. संघाच्या एका कार्यक्रमाला आल्यावर शंकर महादेवन म्हणाले होते की हा कार्यक्रम म्हणजे एक सरगम आहे असे वाटते. परंतु आज त्यांनी आपल्या सरगमातून संघ उभा केला. संघाकडे भारतातील सर्व भाषांमधील गीत असून त्यांची संख्या सुमारे २५ हजारांच्या वर आहे असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले. शरद केळकर यांनी संचालन केले. तर अनिल सोले यांनी आभार मानले. यावेळी जयप्रकाश गुप्ता, अशोक मानकर, राजेश बागडी, दीपक खिरवडकर हेदेखील उपस्थित होते.

कॉपीराईट नसतानादेखील संघगीते अजरामर : मुख्यमंत्री

संघाच्या गीतांचा कॉपीराईट कधीच कोणी मागितला नाही. स्वयंसेवकांच्या तोंडी असलेली गीते कोणी लिहीले याची माहिती नसते, मात्र तरीदेखील गीत अजरामर झाले आहेत. संघ गीतांमधून सांघिक भावना निर्माण होते व प्रत्येक ओळ प्रेरणा देणारी असते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

गीतांतून संघभाव पोहोचतो मनामनांत : नितीन गडकरी

संघ गीतांमध्ये इतकी शक्ती आहे की त्यांच्या स्वरांनी संघाचा भाव थेट मनामनांपर्यंत पोहोचतो. त्याचा सर्वांच्याच व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक परिणाम होतो, अशी भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. आगामी खासदार सांस्कृतिक महोत्सवात संपूर्ण संघगीत संग्रहातील २५ गाण्यांचे सादरीकरण करण्यासाठी शंकर महादेवन यांना तसेच सूत्र संचालन करण्यासाठी शरद केळकर यांना निमंत्रण देत असल्याचे प्रतिपादनदेखील त्यांनी केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : RSS celebrates centenary with song release, Shankar Mahadevan performs.

Web Summary : RSS marked its centenary with the release of 'Sangh Geets,' a collection of songs. Shankar Mahadevan's performance evoked patriotic memories for attendees, including CM Fadnavis and Nitin Gadkari. Gadkari invited Mahadevan to perform the entire collection at a festival.
टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघShankar Mahadevanशंकर महादेवनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMohan Bhagwatमोहन भागवत