शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

मेयो इस्पितळात महिन्याला सरासरी १७२ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 18:58 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच ‘मेयो’ इस्पितळात २०१६ सालापासून तीन वर्षांत सहा हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली. दर महिन्याच्या हिशेबाने मृत्यूची संख्या सरासरी १७२ इतकी आहे.

ठळक मुद्देतीन वर्षांत सहा हजारांहून अधिक मृत्यूची नोंद : २० लाखांहून अधिक रुग्णांनी घेतले उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच ‘मेयो’ इस्पितळात २०१६ सालापासून तीन वर्षांत सहा हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली. दर महिन्याच्या हिशेबाने मृत्यूची संख्या सरासरी १७२ इतकी आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे माहितीच्या अधिकारात विचारणा केली होती. १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत ‘मेयो’ इस्पितळाच्या आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभागात किती रुग्ण आले, यातील किती रुग्णांचा मृत्यू झाला,औषधांवर किती खर्च झाला, पाच लाखांहून अधिक किमतीची किती यंत्रे नादुरुस्त आहेत, याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत ‘मेयो’च्या बाह्यरुग्ण विभागात २० लाख ४४ हजार ३० तर आंतररुग्ण विभागात १ लाख १४ हजार ७४१ रुग्ण आले. यापैकी ६ हजार २०० रुग्णांचा मृत्यू झाला. २०१६ मध्ये २ हजार १२ तर २०१७ मध्ये १ हजार ९८३ रुग्णांचा मृत्यू झाला. २०१८ मध्ये सर्वाधिक २ हजार २०५ मृत्यूंची नोंद झाली.रुग्णांची आकडेवारीवर्ष       बाह्यरुग्ण विभाग                 आंतररुग्ण विभाग              मृत्यू२०१६   ६,८१,४२४                          ३५,२८५                           २,०१२२०१७   ६,९८,८०१                          ३७,९३१                            १,९८३२०१८    ६,६३,८०५                         ४१,५२५                          २,२०५सव्वा कोटींहून अधिकची यंत्रसामुग्री नादुरुस्तप्राप्त माहितीनुसार, ‘मेयो’मध्ये १ कोटी ४१ लाख २४ हजार ४२२ रुपयांची यंत्रसामुग्री नादुरुस्त आहे. यातील ‘एबीजी’च्या (१७ लाख ५६ हजार) दुरुस्तीसाठी कुठलाच उपाय नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय ‘एबीजी विथ इलेक्ट्रोलाईट अ‍ॅनालिसिस’, ‘स्पेस वर्क स्टेशन-४ सिरिंज इन्फ्युजन पंप्स’, ‘वेन्टिलेटर वेला डायमंड’, ‘टू डी कलर डॉप्लर’ हे यंत्रदेखील नादुरुस्त आहेत.

 

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)Deathमृत्यूRight to Information actमाहिती अधिकारRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता