शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

ऑटोरिक्षा पासिंग विलंब शुल्क केले रद्द, कृती समितीच्या लढ्याला यश

By सुमेध वाघमार | Updated: July 11, 2024 19:51 IST

परिवहन वाहनांचा योग्यता प्रमाणपत्र पासिंग नुतनीकरणासाठी विलंब झाल्यास ५० रुपये प्रतिदिन शुल्काची तरतूद करण्यात आली होती.

नागपूर : ऑटोरिक्षा पासिंगसाठी सुरू केलेले ५० रुपये प्रति दिवस विलंब शुल्कच्या विरोधात ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने राज्यभरात आंदोलन उभारले होते. याची दखल घेत मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथ शिंदे यांनी हा विलंब शुल्क रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. समितीच्या लढ्याचे हे यश असल्याचे बोलले जाते.   परिवहन वाहनांचा योग्यता प्रमाणपत्र पासिंग नुतनीकरणासाठी विलंब झाल्यास ५० रुपये प्रतिदिन शुल्काची तरतूद करण्यात आली होती. त्याला उच्च न्यायालय मुंबई येथे आव्हान देण्यात आले. यावर न्यायालयाने अतिरिक्त शुल्क वसूल न करण्याबाबत स्थगिती आदेश दिले. दरम्यान उच्च न्यायालयाने नुकतेच एका सुनावणीत ही स्थगिती रद्द केली. त्यामुळे परिवहन आयुक्तांनी १७ मे २०२४ रोजी आदेश काढून विलंब शुल्क आकारण्याचा सूचना दिल्या. २०१६ पासून विलंब शुल्क लावण्यात आले. त्यामुळे आधीच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या आॅटोचालक कर्जबाजारी होणार होते. 

याविरोधात ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने २४ जून रोजी राज्यभर आंदोलन उभारले. प्रत्येक जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले. नागपुरात कृती समितीचे सरचिटणीस विलास भालेकर यांच्या नेतृत्वात टायगर ऑटोरिक्षा संघटना द्वारा आंदोलन करण्यात आले होते. आमदारांना निवेदन देऊन हा प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडण्याची मागणी करण्यात आली होती. 

मुख्यमंत्री शिंदे यांनी या निवेदनाचा विचार करून पासिंग विलंब शुल्क ५० रुपये प्रति दिवस रद्द करण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी विधिमंडळात मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाची माहिती दिली. ऑटोरिक्षा चालकांच्या एकजुटीने हा न्याय मिळाला असे प्रतिपादन, समितीचे अध्यक्ष शशांक राव व सरचिटणीस विलास भालेकर यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूर