शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात भरधाव आॅटोरिक्षा उलटला; चिमुकलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 10:43 IST

भिवापूर तालुक्यातील नांद येथील पाच महिन्याच्या ‘माही’ला तिचे आईवडील घेऊन आॅटोने उमरेडला निघाले होते. हा आॅटो नांद बसस्टॉपजवळ दोन कि.मी अंतरावर जाताच चालकाचा ताबा सुटला आणि उलटला.

ठळक मुद्देआई - वडील किरकोळ जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: भिवापूर तालुक्यातील नांद येथील पाच महिन्याच्या ‘माही’ला नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये नियमित वैद्यकीय तपासणीसाठी न्यावयाचे असल्याने तिचे आईवडील तिला घेऊन आॅटोने उमरेडला निघाले होते. हा आॅटो नांद बसस्टॉपजवळ दोन कि.मी अंतरावर जाताच चालकाचा ताबा सुटला आणि उलटला. त्यात माहीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिची रुग्णालयात उपचारासाठी नेताना वाटेतच प्राणज्योत मालवली. या अपघातात तिचे आईवडील किरकोळ जखमी झाले. ही दुर्दैवी घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानकापूर (नांद) शिवारातील नागोबा मंदिराजवळ सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.माही ही अमोल रमेश खडसे (३५) व जयश्री अमोल खडसे (३०) रा. नांद, ता. भिवापूर यांची एकुलती एक कन्या होय. तिला सोमवारी नागपूर येथील डागा हॉस्पिटलमध्ये नियमित वैद्यकीय तपासणीसाठी न्यावयाचे असल्याने अमोल व जयश्री नांद बसस्टॉपवर बसची प्रतीक्षा करीत होते. बस न आल्याने त्यांनी एमएच-४०/१७४८ क्रमांकाच्या सहा आसनी आॅटोन उमरेडला जाण्याचा निर्णय घेतला. आॅटोत या तिघांशिवाय अन्य प्रवासी नव्हता. हा आॅटो बसस्टॉपपासून दोन कि.मी. अंतरावर जाताच चालक संदीप ऊर्फ बबलू प्रभाकर फेजदवार (३५) याचा आॅटोवरील ताबा सुटला आणि भरधाव आॅटो उलटला. त्यात माहीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, तिचे आईवडील किरकोळ जखमी झाले. संदीपला मात्र काहीही दुखापत झाली नाही. तिघांनी उलटलेला आॅटो सरळ केला आणि लगेच नांद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.

आॅटोचालक दारूच्या नशेतमाही ही खडसे दाम्पत्याची एकुलती एक कन्या असून, लग्नानंतर सहा वर्षांनी तिचा जन्म झाला होता. दुसरीकडे, संदीप फेजदवार याने शेती विकून मिळालेल्या पैशातून १५ दिवसांपूर्वीच आॅटो विकत घेतला होता. सोमवारी बस बंद असल्याने त्याने पहिल्यांदाच आॅटो प्रवासी नेण्यासाठी घराबाहेर काढला होता. त्यातच तो दारू प्यायलेला होता. अपघातानंतर उलटलेला आॅटो सरळ करून त्याने घर गाठले. घराकडे जाताना वाटेतील चुटे यांच्या घरासमोर ठेवलेल्या पलंगाला आॅटोने धडक दिली. एवढेच नव्हे तर, त्याने स्थानिक नागरिक व पोलिसांशी वाद घातला होता.

टॅग्स :Accidentअपघात