शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

दिल धडकने का सबब.. याद आया; विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गझलांनी श्रोते मंत्रमुग्ध

By जितेंद्र ढवळे | Updated: January 24, 2024 16:14 IST

शतस्पंदन पश्चिम क्षेत्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सव.

जितेंद्र ढवळे, नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ३७ वा पश्चिम क्षेत्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सव सुरू आहे. युवा महोत्सवात विविध राज्यांतील विद्यापीठांमधून आलेले विद्यार्थी त्यांच्या कलागुणांची उधळण करताना दिसून येतात. गुरुनानक भवन येथे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गझलांची मैफिल रंगली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाप्रकारास उपस्थितांनी देखील उत्स्फूर्तपणे साथ दिली.

नागपूर विद्यापीठाची तेजस्विनी सुनील खोडतकर हिने 'वही आज सितारे तराशते थे' ही गझल सादर करीत उपस्थितांची दाद मिळविली. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या विद्यार्थ्याने 'दिल धडकने का सबब याद आया' वो तेरी याद थी अब याद आया, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांने 'दिल है दुखाने के लिए', संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने 'तेरी यादो की तनहाओ में', डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर येथील विद्यार्थिनीने 'मै खयाल हू किसी और, का सोचता कोई और है' अशा एकापेक्षा एक गझल सादर केल्या.

एकल शास्त्रीय संगीत प्रकारामध्ये भारतीय विद्यापीठ पुणे येथील भक्ती सुनील पवार, गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठ आमदाबाद येथील मित्सु दिवेश भट्ट, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील गायत्री लक्ष्मण थिपे, विश्वकर्मा विद्यापीठ पुणे येथील अमन रायथाथा, ॲटलास स्कील तंत्रज्ञान विद्यापीठ मुंबई येथील अनू नवघरे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टीचर एज्युकेशन गांधीनगर येथील कंदर्प पवनकुमार शुक्ला, कर्मवीर भाऊराव पाटील सातारा येथील श्रुतिका श्रीहरी पुजारी, सुदर्शन मच्छिंद्रनाथ नलावडे, एसएनडीटी विद्यापीठ मुंबई येथील प्राजक्ता महादेव शेंद्रे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अभयसिंग चंद्रकांत वाघचौरे, महाराजा कृष्णकुमारसिंहजी भावनगर विद्यापीठ भावनगर येथील ईशा मनीषभाई दवे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील श्री अशोकसिंग भक्ती, हेमचंद्राचार्य नॉर्थ गुजरात विद्यापीठ पटन गुजरात येथील मयूर मुकेशभाई दवे, सरदार पटेल विद्यापीठ आनंद येथील सर्जन शांतीलाल बरिया, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची तेजस्विनी सुनील खोडतकर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील कल्याणी बाबुराव गायकवाड, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथील निषाद प्रमोद व्यास, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील अभिरूप रमाकांत पैंजाने, निरमा विद्यापीठ अहमदाबाद येथील हर्द मेहता, वत्सल उपाध्याय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर येथील आरोही अमोल मंडलिक यांनी सादरीकरण केले.

टॅग्स :nagpurनागपूर