लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या मालमत्ता विभागाने थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. रमन सायन्सजवळील मेसर्स के. एस. एल. अॅन्ड इंडस्ट्रीज लि. एम्प्रेस मॉल रोड येथील ५७ निवासी फ्लॅटचा २०१० पासून मालमत्ता कर थकीत आहे. धंतोली झोन कार्यालयाने वसुलीसाठी वॉरंट बजावल्यानंतरही १७ लाखांची थकबाकी न भरल्याने निवासी फ्लॅटधारकांना लिलावाची नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे फ्लॅटधारकांत खळबळ उडाली आहे.फ्लॅटधारकांनी मेसर्स के. एस. एल. अॅन्ड इंडस्ट्रीज लि. एम्प्रेस मॉल यांच्याकडून फ्लॅट खरेदी करताना ‘सेल अॅग्रीमेंट’ के ले आहे. त्यामुळे नगररचना विभागाला सर्व फ्लॅट एम्प्रेस मॉल व्यवस्थापनाच्या नावावर आहेत. फ्लॅटधारकांच्या नावावर अद्याप नोंद झालेली नाही. ५७ फ्लॅटकडे नऊ लाख रुपये मालमत्ता कर व थकीत रकमेवर लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे. लिलावाची नोटीस बजावताच फ्लॅटधारकांनी दंड माफ करावा यासाठी महापालिका आयुक्तांकडे अर्ज केला आहे. थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी मालमत्ताधारकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय मालमत्ता विभागाने घेतला आहे. त्यानुसार २ कोटी ३४ लाखांची थकबाकी असलेल्या ७३४ मालमत्ताधारकांना वॉरंट बजावण्यात आले होते. यातील ४१७ मालमत्ताधारकांनी ७४ लाख ७६ हजारांची थकबाकी जमा केली. त्यानंतरही थकबाकी न भरलेल्या ३२० मालमत्ताधारकांचा हुकूमनामा प्रसिद्ध करण्यात आला. यातील १२६ लोकांनी थकबाकी जमा केली. परंतु अजूनही १२६ लोकांनी थकबाकी जमा केलेली नाही. त्यांच्या मालमत्ता लिलावात काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मालमत्ताधारकांनी थकबाकी जमा करून कारवाई टाळावी, असे आवाहन मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी केले आहे.
नागपुरातील एम्प्रेस सिटीच्या ५७ निवासी फ्लॅटचा लिलाव करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 00:46 IST
महापालिकेच्या मालमत्ता विभागाने थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. रमन सायन्सजवळील मेसर्स के. एस. एल. अॅन्ड इंडस्ट्रीज लि. एम्प्रेस मॉल रोड येथील ५७ निवासी फ्लॅटचा २०१० पासून मालमत्ता कर थकीत आहे.
नागपुरातील एम्प्रेस सिटीच्या ५७ निवासी फ्लॅटचा लिलाव करणार
ठळक मुद्देमनपाने बजावली नोटीस : १७ लाखांचा मालमत्ता कर थकीत