शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

व्हीआयएच्या अध्यक्षपदी अतुल पांडे बिनविरोध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 22:41 IST

विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) वार्षिक सभेत उद्योजक अतुल पांडे यांची २०१८-१९ या वर्षाकरिता बिनविरोध निवड करण्यात आली. व्हीआयएची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सिव्हिल लाईन्स येथील उद्योग भवनातील व्हीआयएच्या सभागृहात शनिवार, ३० जूनला पार पडली. सभेत सर्वानुमते अध्यक्षपदी अतुल पांडे आणि सचिवपदी डॉ. सुहास बुद्धे यांची निवड करण्यात आली.

ठळक मुद्देउद्योजकांच्या विकासासाठी कार्यरत राहणार : डॉ. सुहास बुद्धे सचिव

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) वार्षिक सभेत उद्योजक अतुल पांडे यांची २०१८-१९ या वर्षाकरिता बिनविरोध निवड करण्यात आली. व्हीआयएची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सिव्हिल लाईन्स येथील उद्योग भवनातील व्हीआयएच्या सभागृहात शनिवार, ३० जूनला पार पडली. सभेत सर्वानुमते अध्यक्षपदी अतुल पांडे आणि सचिवपदी डॉ. सुहास बुद्धे यांची निवड करण्यात आली.पदभार स्वीकारल्यानंतर पांडे म्हणाले, संपूर्ण देशात महाराष्ट्राचा औद्योगिक विकास वेगाने होत आहे. विदर्भातील उद्योजकांच्या समस्या आणि अडचणी सरकार दरबारी मांडून त्या सोडविण्याचे प्रथम कर्तव्य आहे. उद्योजकांच्या विकासासाठी निरंतर कार्यरत राहणार आहे. उद्योजकांच्या उल्लेखनीय विकासासाठी व्यवस्थापक आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न राहील. व्हीआयएची कन्व्हेन्शन सेंटरची मागणी आहे. कार्यशाळा, बिझनेस कॉन्फरन्स आणि प्रदर्शनासाठी व्हीआयएने मिहानमध्ये ४३ एकरची मागणी केली आहे. त्याचा पाठपुरावा करणार आहे. मिहानमध्ये अनेक मोठे उद्योग सुरू होत आहेत. त्याचा फायदा विदर्भातील उद्योजकांना होईल.व्हीआयएच्या अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये माजी अध्यक्ष प्रफुल्ल दोशी, उपाध्यक्ष सुरेश राठी, राजेंद्रकुमार बी गोयनका, आदित्य सराफ, कोषाध्यक्ष गिरीश देवधर, सहसचिव पंकज बक्षी यांचा समावेश आहे. कार्यकारिणी समिती सदस्यांमध्ये आश्रयदाता सदस्य हरगोविंद बजाज, सुरेश अग्रवाल, प्रवीण तापडिया, रोहित बजाज, सत्यनारायण नुवाल, विशाल अग्रवाल, अशोक सी अग्रवाल, अनिल पारख, राकेश खुराणा, असीम सिन्हा, हेमंत लोढा, प्रशांत कुमार मोहता, ओ.एस. बागडिया, गिरीधारी मंत्री, रोहित अग्रवाल, आकाश अग्रवाल, गौरव सारडा, सुरेंद्र लोढा, प्रतीक तापडिया, शैलेंद्र सूचक, यज्ञेश सुरजन आणि स्वीकृत सदस्यांमध्ये नरेश जखोटिया व आशिष चंदाराणा यांचा समावेश आहे.

टॅग्स :nagpurनागपूर