शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांनो लक्ष द्या... आता नागपूरहून थेट गोरखपूरसाठी रेल्वेगाडी; खास उन्हाळ्यात स्पेशल ट्रेन : आजपासून सुरुवात

By नरेश डोंगरे | Updated: April 20, 2024 20:48 IST

नागपूरहून यूपी, बिहारसाठी स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याचे वृत्त लोकमतने १५ एप्रिलच्या अंकात प्रकाशित केले होते, हे येथे उल्लेखनीय!

नागपूर : प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांची कुचंबना होत असल्याचे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने नागपूरहून थेट उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या स्पेशल ट्रेनची व्यवस्था केली आहे. त्यानुसार, आज रविवार, २१ एप्रिलपासून नागपूर-गोरखपूर ही स्पेशल ट्रेन प्रवाशांना सेवा देणार आहे. नागपूरहून यूपी, बिहारसाठी स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याचे वृत्त लोकमतने १५ एप्रिलच्या अंकात प्रकाशित केले होते, हे येथे उल्लेखनीय!

दोन महिन्यांपासून दक्षिणेकडून येणाऱ्या सर्वच गाड्या फुल्ल भरून येत आहेत. नागपूर स्थानकावरून मोठ्या संख्येत चढणाऱ्या प्रवाशांची त्यात भर पडत आहे. त्यामुळे आधीच पाय ठेवायला जागा नसल्याने प्रवासी मिळेल त्या डब्यात प्रवास करीत आहेत. त्यामुळे जनरलच नव्हे तर, स्लिपर आणि एसी कोचमधील प्रवाशांनाही त्रास होऊ लागला आहे. स्लिपर, एसी कोचमधील स्वच्छतागृहाजवळ प्रवासी दाटीवाटीने उभे असल्याने, कन्फर्म तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांची तीव्र कुचंबणा होत आहे. लोकमतने या संबंधाने सचित्र वृत्त प्रकाशित केल्यामुळे शीर्षस्थ अधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेतली होती. या पार्श्वभूमीवर नागपूरहूनच थेट यूपी, बिहारकडे जाण्यासाठी नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात दिल्ली बोर्डाकडे पाठविला होता. त्याचेही वृत्त ‘लोकमत’ने १५ एप्रिलला प्रकाशित केले होते. एका आठवड्यात ही गाडी सुरू होणार असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने या वृत्तात नमूद केेले होते. या पार्श्वभूमीवर, आज रेल्वे प्रशासनाने ०१२०७ नागपूर-गोरखपूर ही नवीन विशेष रेल्वेगाडी २१ एप्रिलपासून सुरू करण्याची घोषणा केली आहे.

रोज सकाळी सुटणार, दुसऱ्या दिवशी पोहचणारही गाडी रविवारपासून दररोज सकाळी ७.३० वाजता नागपूर स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१५ वाजता गोरखपूरला पोहचेल. त्याच प्रमाणे ०१२०८ गोरखपूर-नागपूर ही २२ एप्रिलपासून दररोज सकाळी ९.१५ वाजता गोरखपूर स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता नागपूर स्थानकावर दाखल होईल. भर उन्हाळ्यात सुरू करण्यात आलेल्या या स्पेशल ट्रेनमुळे यूपी बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांना चांगला दिलासा मिळणार, असा विश्वास वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी व्यक्त केला आहे.

या ठिकाणच्या प्रवाशांनाही लाभया गाडीला १९ कोच राहणार आहेत. त्यात १२ एसी थ्री टियर ईकॉनाॅमी, ५ सामान्य द्वितीय श्रेणी, १ लगेच कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कारचा त्यात समावेश आहे. नागपूर-गोरखपूर मार्गावरील आमला, बैतूल, घोडाडोंगरी, इटारसी, भोपाळ, ललितपूर, लक्ष्मीबाई झांसी, उरई, पोखरायन, कानपूर सेंट्रल, उन्नाव, ऐशबाग, बादशाहनगर, बाराबंकी, गोंडा, मानकापूर, बस्ती आणि खलीलाबाद आदी स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेUttar Pradeshउत्तर प्रदेशIndian Railwayभारतीय रेल्वे