शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 03:28 IST

रेशीमबाग येथे शनिवारी विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी ते बोलत होते. 

नागपूर : आज भारतात जात, भाषा, प्रदेश इत्यादींच्या आधारे समाजाला वेगळे करून संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे पंजाब, जम्मू-काश्मीर, लद्दाख, केरळ, तामिळनाडू आणि बिहारपासून मणिपूरपर्यंत संपूर्ण पूर्वांचल अस्वस्थ आहे, असे सांगत देशात जातीपातीच्या आधारावर निर्माण होत असलेले भेद व त्या माध्यमातून अराजकता पसरविण्याच्या प्रयत्नांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी चिंता व्यक्त केली. रेशीमबाग येथे शनिवारी विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी ते बोलत होते. 

संघाच्या स्थापनेला शनिवारी ९९ वर्षे पूर्ण झाले असून, संघाने शताब्दी वर्षात पदार्पण केले आहे. यावेळी डॉ. भागवत म्हणाले, देशात विनाकारण कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्ये अचानक वाढ होत आहे. परिस्थिती किंवा धोरणांबद्दल असंतोष असू शकतो, परंतु ते व्यक्त करण्याचे  लोकशाही मार्ग आहेत. 

भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, ही गुंडगिरी हिंसाचार करणे, समाजातील एखाद्या विशिष्ट वर्गावर हल्ला करणे, भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, ही गुंडगिरी आहे, असेही डॉ. भागवत यावेळी म्हणाले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशा वागण्याला ‘अराजकते’चे असे म्हटले आहे, याकडे सरसंघचालकांनी लक्ष वेधले. पावसामुळे मैदानात चिखल झाला होता. त्यामध्येही स्वयंसेवकांनी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.  कार्यक्रमाला इस्त्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन हे प्रमुख अतिथी होते. 

गडकरी, फडणवीस संघाच्या गणवेशातकार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संघाच्या गणवेशात उपस्थित होते. राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील उपस्थित होते.

सरसंघचालक म्हणाले...-जगात भारताचा दबदबा वाढला. मात्र, काही तत्त्व अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. देशाची प्रतिमा मलिन करण्यासाठी षडयंत्र रचण्यात येत आहेत.-बांगलादेशमधील हिंदूंवर झालेले हल्ले हा गंभीर प्रकार होता. तेथील अत्याचारी कट्टरपंथीय लोक सक्रिय आहेत. तोपर्यंत हिंदूंसोबत अल्पसंख्यांक समाजावर सातत्याने धोक्याची तलवार लटकत राहणार आहे.  -विशिष्ट घटकांच्या असंतोषाला हवा देऊन तो घटक समाजापासून वेगळा आणि व्यवस्थेविरुद्ध आक्रमक बनवला जात आहे. देशहितापेक्षा स्वार्थाच्या राजकारणाला जास्त प्राधान्य देण्यात येत आहे.-कोलकाता अत्याचारानंतर गुन्हेगारांच्या संरक्षणासाठी काही लोकांकडून जे घृणास्पद प्रयत्न केले गेले त्यातून गुन्हेगारी, राजकारण आणि दुष्कृती यांची सांगड आपल्याला कशी बिघडवत आहे, हेच दिसून येते. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ