नागपूर : पेट्रोलच्या पैशावरून झालेल्या वादात आरोपीने माचिसची काडी उगारून पेट्रोल पंप जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना वाडी परिसरात मंगळवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. आशिष वंदेकर (३४) रा. स्वावलंबीनगर असे आरोपीचे नाव आहे. आशिष मंगळवारी रात्री १२ च्या सुमारास आपल्या काही मित्रांसोबत हिरो होंडा गाडीने (एमएच/३१-एवाय-७८४७) वाडी येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आला. त्याने फिर्यादी सूर्यकांत जगताप यांना १०० रुपयाचे पेट्रोल भरण्यास सांगितले. पेट्रोल भरल्यानंतर आशिषने ५० रुपये घेण्यास सांगितले यावरून दोघांत वाद झाला यावर आशिषने तेरा पेट्रोल पंप जला डालेंगे, अशी धमकी देत माचिसची काडी उगारून पेट्रोल पंपावरील मशीनवर फेकली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
वाडीतील पेट्रोल पंप जाळण्याचा प्रयत्न
By admin | Updated: July 30, 2015 02:47 IST