शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या  कोराडी प्रदर्शनात युवकाचा हत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:39 IST

कोराडी परिसरातील प्रदर्शनात पत्नीशी बातचीत करणाऱ्या ३५ वर्षीय टॅक्सी ड्रायव्हरचा आरोपी पतीने धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री २.३० वाजता घडली.

ठळक मुद्दे पत्नीशी अनैतिक संबंधाचा संशय 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोराडी परिसरातील प्रदर्शनात पत्नीशी बातचीत करणाऱ्या ३५ वर्षीय टॅक्सी ड्रायव्हरचा आरोपी पतीने धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री २.३० वाजता घडली.सुनील वासुदेव परतेकी असे जखमीचे नाव असून तो खंडाला, पारशिवनी येथील रहिवासी आहे. आरोपी पती शुद्धोधन चैतराम लांजेवार (३६) असून तो करंभाल, पारशिवनी येथे राहतो.प्राप्त माहितीनुसार, शुद्धोधन आणि सुनील परतेकी यांचे पूर्वी घरगुती संबंध होते. यादरम्यान शुद्धोधनला सुनीलचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आला. शुद्धोधनची पत्नी प्रदर्शनात तिकीट काऊंटर सांभाळते. त्यामुळे त्याने पत्नीला सुनीलपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. सुनील पत्नीला भेटत असल्याची माहिती त्याला मिळाली. सोमवारी शुद्धोधन प्रदर्शनाजवळच दोघांवर लक्ष ठेवून होता.टॅक्सी ड्रायव्हर सुनीलने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सुनील कोराडी मंदिरात सोमवारी मध्यरात्री २.३० वाजता दर्शनासाठी आला होता. यावेळी प्रदर्शनात काऊंटरजवळ शुद्धोधनच्या पत्नीची भेट झाली. दोघांची बातचीत सुरू असतानाच शुद्धोधन त्या ठिकाणी पोहोचला. शुद्धोधनने सुनीलला त्याच्या पत्नीपासून दूर राहण्याचा सल्ला देतानाच मारून टाकण्याची धमकी दिली आणि त्याचवेळी धारदार शस्त्राने हल्ला केला. सुनीलच्या तक्रारीवरून कोराडी पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक पोलीस निरीक्षक जी. कंकाल यांनी आरोपीच्या विरोधात हत्येचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणाची नोंद केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर