शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यात तिखट फेकून खुनाचा प्रयत्न : युवकाची मृत्यूशी झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:19 IST

जुन्या वादातून तिघांनी एका युवकाच्या डोळ्यात तिखट फेकून तलवार आणि चाकूने हल्ला करीत खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री सदर परिसरात घडली.

ठळक मुद्देमेयो रुग्णालयात केले दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुन्या वादातून तिघांनी एका युवकाच्या डोळ्यात तिखट फेकून तलवार आणि चाकूने हल्ला करीत खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री सदर परिसरात घडली.अनिकेत मुकेश अंगलवार (२७) रा. खलासी लाईन असे जखमी युवकाचे नाव असून तो मेयो रुग्णालयात दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत हा रविवारी रात्री साडेनऊ वाजता खलासी लाईन चौरसिया चौकात मित्रासोबत उभा होता. दरम्यान, आरोपी उमेश ऊर्फ अम्मू मनोजकुमार पैसाडेली (२५) रा. कडबी चौक), मॉरीस आरीक स्वामी फ्रान्सिस आणि फरहान ऊर्फ गट्टू फिरोज बेग दोघेही रा. कॅथलिक क्लब, खलासी लाईन हे तेथे आले. त्यांनी जुन्या वादातून अनिकेतशी वाद घातला. त्यानंतर चिडलेल्या आरोपींनी पाठीमागे लपविलेली तलवार, चाकू आणि लोखंडी रॉड काढले आणि अनिकेतच्या डोळ्यात तिखट फेकले. त्यानंतर अनिकेतवर अचानक हल्ला केला करीत खून करण्याचा प्रयत्न केला. अनिकेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपींनी पळ काढला. गंभीर जखमी अनिकेतला मित्रांनी मेयो रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी आरोपींविरुद्ध खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केली नव्हती. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक गठित केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर