शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अकाऊंट हॅक करून ८४ लाख काढण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 09:39 IST

नागपुरात जिनिंग व्यापाऱ्याचे अकाऊंट हॅक करून ८४ लाख रुपये काढून घेण्याचा एका गुन्हेगाराने प्रयत्न केला. त्यातील १४ लाख रुपये दुसऱ्या खात्यात वळतेही केले. मात्र, लगेच ही बाब लक्षात आल्याने व्यापाऱ्याची रोकड बचावली.

ठळक मुद्दे१४ लाख दुसऱ्या खात्यात वळते केलेगणेशपेठमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिनिंग व्यापाऱ्याचे अकाऊंट हॅक करून ८४ लाख रुपये काढून घेण्याचा एका गुन्हेगाराने प्रयत्न केला. त्यातील १४ लाख रुपये दुसऱ्या खात्यात वळतेही केले. मात्र, लगेच ही बाब लक्षात आल्याने व्यापाऱ्याची रोकड बचावली. व्यापारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून देणारी ही घटना गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.मेडिकल चौकाजवळ बोथरा कॉम्प्लेक्समध्ये राहणारे सुनील लक्ष्मीचंद बोथरा (वय ५३) यांची जिनिंग फॅक्टरी आहे. या फर्मच्या नावे असलेल्या बँक खात्याचे चेकबुक बोथरा यांच्या कार्यालयातून ३० जानेवारीला चोरी गेले. बोथरा यांच्या ते लक्षात आले नाही. आरोपीने त्या चेकवर बनावट सही करून बोथरा यांच्या खात्यातून ८४ लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला. त्यातील १४ लाख रुपये तुमकर कामत नामक व्यक्तीच्या खात्यातआरटीजीएस करून घेतले. हा गैरप्रकार लक्षात आल्याने बोथरा यांनी लगेच बँक अधिकाऱ्यांशी संपर्क करून ही संपूर्ण रक्कम फ्रीज केली. त्यामुळे आरोपीला ती काढून घेता आली नाही. त्यानंतर आरोपीने बोथरा यांचे इंटरनेट बॅकिंग अ‍ॅक्टिव्ह केले. त्यातून किती रक्कम कुठे शिल्लक होती, त्याची माहिती घेतली. त्या आधारे नेट बँकिंगचे स्टार टोकन रजिस्टर्ड करून बोथरा यांचा मोबाईल नंबर बदलवून घेतला. बँक खात्यातून रक्कम काढली गेल्यास लगेच संबंधित खातेधारकाला मेसेज येतो, बोथरा यांना मेसेज कळू नये म्हणून आरोपीने ही बनवाबनवी केली. मात्र, रोजचा व्यवहार होऊनही आपल्या मोबाईलवर मेसेज येत नसल्याचे लक्षात आल्याने बोथरा यांनी पुन्हा बँक अधिकाऱ्यांसोबत संपर्क केला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. गणेशपेठ पोलिसांनी फसवणूक तसेच माहिती व तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला.कोण आहे तुमकर कामत ?या गुन्ह्याची सुरुवात चेकबुक चोरून केली. त्यामुळे चेकबुक चोरणारा आरोपी बोथरा यांच्या संपर्कातील किंवा त्यांच्याकडे येणे-जाणे करणारा असावा, असा संशय आहे. आरोपीने ज्याच्या खात्यात १४ लाख रुपये वळते केले तो तुमकर कामत कोण आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. तो हाती लागल्यास या प्रकरणातील आरोपी आणि सर्व घटनाक्रम सहजपणे उघड होईल, असा पोलिसांचा विश्वास आहे.

 

टॅग्स :crimeगुन्हे