शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कुख्यात गुंडाची हत्या करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:33 IST

मरारटोलीतील बहुचर्चित बग्गा बाबा हत्याकांडातील मुख्य आरोपी प्रणय हरिदास कावरे (वय १९) याच्यावर प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी सशस्त्र हल्ला चढवून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी दिवसाढवळ्या वर्दळीच्या भागात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला.

ठळक मुद्देमरारटोलीत पुन्हा टोळीयुद्ध : दिवसाढवळ्या तलवारीने भोसकले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मरारटोलीतील बहुचर्चित बग्गा बाबा हत्याकांडातील मुख्य आरोपी प्रणय हरिदास कावरे (वय १९) याच्यावर प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी सशस्त्र हल्ला चढवून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी दिवसाढवळ्या वर्दळीच्या भागात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. जखमी प्रणयची प्रकृती गंभीर असून, पोलिसांनी या प्रकरणी अल्पवयीन आरोपींसह चौघांना ताब्यात घेतले आहे.मरारटोली परिसरात नीलेश ऊर्फ बग्गा बाबा कौरती आणि मुकुंद बाबा खंडाते हे बुवाबाजी करायचे. त्यांच्याकडे नेहमी दरबार भरायचा अन् अंगारेधुपारेही चालायचे. या दरबारात झोपडपट्टीतील अंधश्रद्ध मंडळींसोबत कुख्यात गुन्हेगारांचीही नेहमी हजेरी राहायची. आपल्या दरबाराचा प्रभाव वाढवण्यासाठी या दोघांमध्ये वैमनस्य आले. दोघांच्याही हाताशी गुंडांच्या टोळ्या असल्याने तो वाद टोकाला गेला. या पार्श्वभूमीवर, १६ डिसेंबर २०१६ ला आरोपी मुकुंद खंडाते प्रणय कावरे, बाबल्या सेंगर यांनी बग्गाची हत्या केली होती. पाच महिन्यांपूर्वी आरोपी कारागृहातून जामिनावर बाहेर आले. आरोपी प्रणय कावरे त्याच्या आजीसह मरारटोलीत राहायचा. मरारटोलीत त्याने आपला दबदबा निर्माण करण्यासाठी दरबार भरविण्याचा प्रयत्न चालविला होता. दुसरीकडे त्याचा प्रतिस्पर्धी अभिनव गजबेनेही असाच प्रकार चालविला. त्यामुळे या दोघांच्या टोळ्यांमध्ये वादविवाद वाढला होता. पोलीस ठाण्यात तक्रारीही झाल्या होत्या.सकाळी भांडण, दुपारी हल्लाया पार्श्वभूमीवर, गुरुवारी सकाळी प्रणय आणि आरोपींमध्ये पुन्हा भांडण झाले. प्रणयने त्यांना शिविगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली. दुपारी १२ च्या सुमारास प्रणय मरारटोलीतील मैदानावर परतला. यावेळी आरोपी हल्ल्याच्या तयारीत असल्याचा अंदाज आल्याने तो मोपेडवरून पळू लागला. आरोपी अभिनव आणि त्याच्या साथीदारांनी पाठलाग करून त्याच्या पाठीत धारदार शस्त्राचे वार केले. जीवाच्या आकांताने आरडाओरड करीत प्रणय बाजूच्या घरात शिरला. नागरिक जमल्याचे पाहून आरोपी पळून गेले. एकाने ही माहिती नियंत्रण कक्षाला दिली. तेथून अंबाझरी पोलिसांना घटना कळली. पोलीस पोहचेपर्यंत तेथे मोठी गर्दी जमली होती. जखमी प्रणयला रवीनगर चौकातील डॉ. पिनाक दंदे यांच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. पोलिसांनी चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. मुख्य आरोपी अभिनव फरार आहे. या घटनेमुळे मरारटोलीत प्रचंड तणावाचे वातावरण आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrimeगुन्हा