शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  दगडविटांनी ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 22:53 IST

उधार घेतलेल्या पैशावरून निर्माण झालेल्या वादात चौघांनी एकाला दगडविटांनी ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मनोजसिंग बुंदेल (वय ३६) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. रविवारी रात्री ही घटना घडली.

ठळक मुद्देउधारीच्या पैशाचा वाद : गिट्टीखदानमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उधार घेतलेल्या पैशावरून निर्माण झालेल्या वादात चौघांनी एकाला दगडविटांनी ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मनोजसिंग बुंदेल (वय ३६) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. रविवारी रात्री ही घटना घडली.बुंदेल हे व्यावसायिक असून ते सुरेंद्रगड गिट्टीखदानमध्ये राहतात. आरोपी राहुल लांडेकर (वय १९), विष्णू शिशुवार (वय १८) परिक्षित मरस्कोल्हे (वय २०) आणि जॉन फर्नांडिस (सर्व रा. मानवतानगर) यांच्यासोबत बुंदेल यांचा १२०० रुपयांच्या उधारीवरून वाद होता. त्यांच्यात यापूर्वी कुरबूरही झाली होती. रविवारी रात्री १०.३० वाजता बुंदेल आणि आरोपी हे गिट्टीखदानमधील बेडिवाले दर्गाहजवळ समोरासमोर आले. आरोपींनी बुंदेल यांना १२०० रुपये परत मागितल्याने त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. त्यानंतर चारही आरोपींनी आधी हातबुक्की आणि लाठीने बुंदेल यांना मारहाण केली. नंतर त्यांना दगडविटाने ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावल्याने आरोपी पळून गेला. जबर जखमी झालेल्या बुंदेल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती कळताच गिट्टीखदान पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी बुंदेल यांचे बयाण नोंदविले. शालिनी मनोजसिंग बुंदेल (वय २८) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर