लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : न्यायालयात साक्ष देण्यापासून थांबविण्यासाठी मूर्तिकाराला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपी गुंडाने मूर्तिकारावर तलवारीने हल्ला केला. ही घटना सोमवारी रात्री गाडीखाना येथे घडली.चंद्रकांत संकुरवार (५२) असे जखमी मूर्तिकाराचे तर, शानू ऊर्फ शाहनवाज खान (१९) असे आरोपीचे नाव आहे. दोघेही गाडीखाना येथील रहिवासी आहेत. चार वर्षांपूर्वी चंद्रकांतचा शानूच्या नातेवाईकासोबत वाद झाला होता. दरम्यान, शानूच्या नातेवाईकाने चंद्रकांतला मारहाण करून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर चंद्रकांतने गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यामुळे संबंधित नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ती तक्रार परत घेण्यासाठी शानू व त्याचा नातेवाईक गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रकांतवर दबाव आणत होते. चंद्रकांत त्यांना जुमानला नाही. पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यावर सुनावणी सुरू झाली. तेव्हापासून चंद्रकांतला न्यायालयात साक्ष देण्यापासून थांबविण्याचे प्रयत्न केले जात होते. चंद्रकांतने तडजोड करण्यास नकार दिल्यामुळे, शानूने एक महिन्यापूर्वी त्याच्या घरावर हल्ला केला होता. घरात तोडफोड करून चंद्रकांतला जखमी केले होते. त्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी शानूविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली होती. यावेळी शानूने चंद्रकांतला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.
नागपुरात मूर्तिकाराला ठार मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 00:34 IST
न्यायालयात साक्ष देण्यापासून थांबविण्यासाठी मूर्तिकाराला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपी गुंडाने मूर्तिकारावर तलवारीने हल्ला केला. ही घटना सोमवारी रात्री गाडीखाना येथे घडली.
नागपुरात मूर्तिकाराला ठार मारण्याचा प्रयत्न
ठळक मुद्देगाडीखानातील घटना : गणेशपेठ पोलिसांनी नोंदवला गुन्हा