शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:33 IST

दारूच्या नशेत टुन्न असलेले मित्रच एका तरुणाच्या जीवावर उठले. त्यांनी सुमेध हेमराज तिरपुडे (वय २७) याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामगारनगरात सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. गंभीररीत्या भाजलेला सुमेध जगण्यामरण्याचा संघर्ष करीत आहे.

ठळक मुद्देजरीपटक्यात थरार : आरोपी फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दारूच्या नशेत टुन्न असलेले मित्रच एका तरुणाच्या जीवावर उठले. त्यांनी सुमेध हेमराज तिरपुडे (वय २७) याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामगारनगरात सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. गंभीररीत्या भाजलेला सुमेध जगण्यामरण्याचा संघर्ष करीत आहे.म्हाडा वसाहत, बसथांब्याजवळ राहणारा सुमेध इंदोरा चौकात बुक आणि वर्तमानपत्राचा स्टॉल चालवितो. आरोपी राजेंद्रसिंग सुखदेवसिंग भाटिया (वय २७, रा. बाबादीपसिंगनगर) याच्यासोबत त्याची मैत्री होती. सोमवारी सायंकाळी सुमेधने भाटियाची बुलेट चालवायला घेतली तर भाटियाने रमजू नामक आरोपीची स्प्लेंडर चालवायला घेतली. ते फेरफटका मारत असताना स्प्लेंडरमधील पेट्रोल संपले. त्यामुळे आरोपी भाटिया, रमजू आणि त्यांच्या एका मित्राने कामगारनगरातील पंपावर जाऊन बाटलीत पेट्रोल आणले. येताना त्यांच्यात काय कट झाला, कळायला मार्ग नाही. आरोपींनी बाटलीतील पेट्रोल स्प्लेंडरमध्ये टाकण्याऐवजी सुमेधच्या अंगावर ओतले. त्यानंतर आरोपी भाटियाने माचिसची काडी उगाळून सुमेधला पेटविण्याचा प्रयत्न केला. सुमेधने ती काडी कशीबशी विझविली. तेवढ्या वेळेत आरोपीने अन्य दोघांना इशारा केला. त्यामुळे तिसऱ्या आरोपीने माचिसची काडी उगाळून सुमेधच्या अंगावर फेकली. पाहता पाहता सुमेधच्या सर्वांगाने पेट घेतला. तो वेदनांनी आक्रोश करीत असताना आरोपी पळून गेले. आजूबाजूच्यांनी त्याला कसेबसे विझविले. त्याला मेयोत दाखल करण्यात आले. या प्रकरणाची माहिती जरीपटका ठाण्यात कळविण्यात आली. पीएसआय टेमगिरेंनी गंभीर अवस्थेतील सुमेधचे बयान नोंदविले. त्यावरून आरोपी भाटिया, रमजू आणि अन्य एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांची भूमिका संशयास्पदएवढ्या गंभीर प्रकरणात जरीपटका पोलिसांनी थंड भूमिका स्वीकारली आहे. २४ तास होऊनही त्यांनी या प्रकरणाचे कारण आणि आरोपींचे नाव सांगण्यास ते टाळाटाळ करीत आहेत. पीएसआय टेमगिरेंनी या प्रकरणात दोघांना अटक केली, मात्र नाव आठवत नसल्याचे म्हटले. हा तपास आता पीएसआय डाकेंकडे गेल्याचे ते म्हणाले. डाकेंशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दुसरीकडे आरोपी भाटियाचे काही साथीदार सोमवारी सायंकाळपासूनच जरीपटका ठाण्यातील ‘सेटर’सोबत संपर्कात असल्याची चर्चा आहे. एकूणच घटनाक्रमामुळे या प्रकरणात जरीपटका पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरली आहे.

टॅग्स :fireआगCrimeगुन्हा