शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात जुन्या वादातून हल्ला : तरुण गंभीर जखमी, आईलाही मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 19:23 IST

जुन्या वादातून एका तरुणावर तिघांनी प्राणघातक हल्ला चढवला. शस्त्राचे घाव घालून त्याला गंभीर जखमी केले. जखमी तरुणाची आई मदतीला धावली असता आरोपीने तिलाही मारहाण केली.

ठळक मुद्देअजनीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुन्या वादातून एका तरुणावर तिघांनी प्राणघातक हल्ला चढवला. शस्त्राचे घाव घालून त्याला गंभीर जखमी केले. जखमी तरुणाची आई मदतीला धावली असता आरोपीने तिलाही मारहाण केली.रविवारी रात्री ११ च्या सुमारास अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सुदर्शन संजय जाधव (वय २२) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ,वसंतनगर गल्ली नंबर १३ येथे राहतो. सुदर्शनच्या भावासोबत आरोपी सनी जांगिडयाचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. यावेळी सुदर्शनने सनीला दमदाटी केली होती. सनीच्या मनात तो राग होता. रविवारी रात्री ११ च्या सुमारास सुदर्शन त्याच्या मित्रांसोबत घरासमोर गप्पा करीत बसला होता. तेवढ्यात आरोपी सनी आणि त्याचे दोन साथीदार तेथे आले. त्यांनी सुदर्शन सोबत वाद घालून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. डोक्यावर, हातावर वार झाल्याने सुदर्शन गंभीर जखमी झाला. मुलाला शस्त्राने मारत असल्याचे पाहून सुदर्शनची आई बचावासाठी धावली असता आरोपीने त्यांनाही मारहाण केली. त्यामुळे आईच्या हातावरही जखमा झाल्या. आरडाओरड ऐकून शेजारी धावले. त्यानंतर आरोपी पळून गेले. या घटनेची तक्रार सुदर्शन जाधव यांनी अजनी पोलिस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी कलम ३२६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी सनी आणि त्याच्या साथीदारांची चौकशी सुरू आहे. जखमी सुदर्शन जाधव यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर