शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

व्यक्ती केवळ एससी-एसटी आहे म्हणून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा होत नाही : सत्र न्यायालयाचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 22:38 IST

Atrocity act तक्रारकर्ती व्यक्ती अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहे, या केवळ एकमेव कारणावरून कुणाविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही. कायदेमंडळालाही हे अपेक्षित नाही असे मत सत्र न्यायालयाने एका अटकपूर्व जामीन अर्जावरील निर्णयात व्यक्त केले.

ठळक मुद्देकायदेमंडळालाही हे अपेक्षित नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तक्रारकर्ती व्यक्ती अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहे, या केवळ एकमेव कारणावरून कुणाविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही. कायदेमंडळालाही हे अपेक्षित नाही असे मत सत्र न्यायालयाने एका अटकपूर्व जामीन अर्जावरील निर्णयात व्यक्त केले.

न्या़ बी़ पी़ क्षीरसागर यांनी हा निर्णय दिला. अजनी पोलिसांनी मंगलदीपनगर येथील डॉ. सनील वर्गीस यांच्याविरुद्ध एका मुलीच्या तक्रारीवरून विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवला आहे. सुरुवातीला पोलिसांनी केवळ विनयभंगाचा गुन्हा नोंदवला होता. तपासादरम्यान, तक्रारकर्ती मुलगी अनुसूचित जमाती व डॉ. वर्गीस खुल्या प्रवर्गातील असल्याचे कळल्यानंतर एफआयआरमध्ये अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील गुन्ह्यांचा समावेश करण्यात आला. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या उद्देशावर सखोल भूमिका मांडली.

भारतातील सामाजिक रचना अद्वितीय आहे. हा देश जगामध्ये विविधतेत एकतेसाठी ओळखला जातो. या देशात विविध जाती-धर्माचे नागरिक एकत्र नांदतात. जाती, धर्म इत्यादीवरून कुणासोबतही भेदभाव करण्यास बंदी आहे. त्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या आहेत. अ‍ॅट्रॉसिटी कायदा त्यापैकीच एक आहे. परंतु, तक्रारकर्ती व्यक्ती अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहे, या केवळ एकमेव आधारावर कुणाविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकत नाही. असे केल्यास भारतीय सामाजिक रचनेला बाधा पोहोचेल. या कायद्यातील तरतुदी आकर्षित होण्यासाठी संबंधित व्यक्तीविरुद्ध, ती अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहे म्हणून गुन्हा घडणे आवश्यक आहे असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले.

अटकपूर्व जामीन मंजूर

न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता डॉ. सनील वर्गीस यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. संबंधित मुलगी अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहे म्हणून, वर्गीस यांनी तिचा विनयभंग केला याचे पुरावे रेकॉर्डवर नाहीत, असे निर्णयात नमूद करण्यात आले. संबंधित मुलगी वर्गीस यांच्या वृद्धाश्रमात नर्स होती. वर्गीस यांनी १९ एप्रिल २०२१ रोजी रात्री मुलीचा विनयभंग केला अशी तक्रार आहे. वर्गीस यांच्यातर्फे अ‍ॅड. समीर सोनवणे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Atrocity Actअॅट्रॉसिटी कायदाCourtन्यायालयnagpurनागपूर