शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

अन् नागपूरशी अटलजींचे जुळले कौटुंबिक नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 22:17 IST

साधारणत: एखादी व्यक्ती राजकारणात उच्च पदावर पोहोचली की कुटुंबीयांपासून काही प्रमाणात दुरावत जाते. मात्र सर्वच बाबतीत वेगळेपण जपलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कुटुंबीयांना कधीच अंतर दिले नाही. ते स्वत: जरी अविवाहित असले तरी भावाबहिणींच्या कुटुंबाला त्यांनी नेहमी आपले मानून जिव्हाळा दिला. संघाच्या माध्यमातून नागपूरशी जुळणाऱ्या अटलजींचा शहराशी कौटुंबिक संबंधदेखील आला. सख्खी भाची अनिता पांडे यांना भेटण्यासाठी कुठलाही बडेजाव न करता अटलजी नागपुरात आले होते.

ठळक मुद्देसख्ख्या भाचीला भेटण्यासाठी अनेकदा आले उपराजधानीत : कुटुंबीयांना कधीच दिले नाही अंतर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारणत: एखादी व्यक्ती राजकारणात उच्च पदावर पोहोचली की कुटुंबीयांपासून काही प्रमाणात दुरावत जाते. मात्र सर्वच बाबतीत वेगळेपण जपलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कुटुंबीयांना कधीच अंतर दिले नाही. ते स्वत: जरी अविवाहित असले तरी भावाबहिणींच्या कुटुंबाला त्यांनी नेहमी आपले मानून जिव्हाळा दिला. संघाच्या माध्यमातून नागपूरशी जुळणाऱ्या अटलजींचा शहराशी कौटुंबिक संबंधदेखील आला. सख्खी भाची अनिता पांडे यांना भेटण्यासाठी कुठलाही बडेजाव न करता अटलजी नागपुरात आले होते.अटलबिहारी वाजपेयी यांना तीन बहिणी होत्या. त्यांची सर्वात लहान बहीण उर्मिलावर अटलजींचा विशेष जीव होता. उर्मिला यांची मुलगी अनिता यांचा नागपुरातील ओमप्रकाश पांडे यांच्याशी १९८५ साली विवाह झाला आणि एका नव्या नात्याने नागपूर अटलजींशी जोडल्या गेले. ‘लोकमत’ने देवनगर येथे राहणाऱ्या अनिता पांडे यांच्याकडून अटलबिहारी वाजपेयी यांच्यातील कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व जाणून घेतले.बच्चे कंपनीचे होते ते ‘मामू’आमच्या लहानपणी अटलजी आमचे आवडते ‘मामू’ होते. कामातून वेळ मिळाला की ते हमखास ग्वाल्हेरला यायचे व आमच्यासमवेत वेळ घालवायचे. मुलांना तर ते फारच आवडायचे. ‘चलो कही घूम आते है..’ असे ते म्हणायचे आणि सर्व मुलांना घेऊन कधी जत्रा, कधी चित्रपट पाहण्यासाठी घेऊन जायचे. त्यांना चांगल्या चित्रपटांची आवड होती, असे अनिता पांडे यांनी सांगितले.नागपूरची कचोरी व कढीचे होते चाहतेमाझे मामा अटलबिहारी वाजपेयी हे खवय्ये होते. त्यांना महाराष्ट्रीयन पदार्थदेखील आवडत असत. नागपूरला आले की कचोरी, मुगाचे वडे, बुंदीचे लाडू यांची फर्माईश तर असायचीच शिवाय कढीचे ते चाहते होते. नागपुरात ते आमच्याच घरी जेवत असत. एकदा घरी यायला वेळ नसल्यामुळे त्यांनी नाश्ताच विमानतळावर मागवून घेतला होता. प्रकृती ठीक नसताना त्यांच्यासाठी साधे जेवण बनायचे. त्यावेळी ते हट्टाने सर्वांसाठी बनलेले जेवण मागायचे, अशी आठवण सांगताना अनिता पांडे यांचे डोळे भरून आले होते.लग्नानंतर दिले ‘सरप्राईज’माझे लग्न १९८५ साली झाले व त्यात अटलबिहारी वाजपेयी आवर्जून उपस्थित होते. लग्न झाल्यानंतर आठवडाभरातच ते नागपूरला माझ्या सासरी आले. कुठलीही पूर्वकल्पना न देता ते आले होते व लाडक्या भाचीला माहेरी मांडवपरतणीसाठी नेण्यासाठी हे ‘सरप्राईज’ दिले असल्याचे त्यांनी सांगितले होते.नातवांत व्हायचे रममाणअटलबिहारी वाजपेयी यांनी नातवांसमवेतदेखील जिव्हाळा कायम ठेवला होता. आपला भाचा-भाची यांच्या मुलांची प्रकृती, शिक्षण इत्यादींची ते निमयित विचारपूस करत. माझी मुलगी प्रियंका हिला ते नेहमी ‘चिकू’ अशी हाक मारायचे. घरी आले की ‘हम तो चिकू खाने है... कहा है हमारी चिकू’ असे म्हणत प्रियंकाला बोलवायचे. घरी आल्यावर बच्चेकंपनीसमवेत ते वय विसरून रममाण व्हायचे, अशी आठवण अनिता पांडे यांनी सांगितली. 

 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीnagpurनागपूर