शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरकरांमध्ये वाढला १० टक्क्याने अस्थमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 11:49 IST

धुळीमुळे व वाहनांतून निघणाऱ्या विषारी धुरांमुळेही अस्थमा म्हणजे दम्याचे रुग्ण वाढत आहे. नागपुरात हा आजार १० टक्क्याने वाढल्याची माहिती पल्मनोलॉजिस्ट डॉ. विक्रांत देशमुख यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देयोग्य उपचाराच्या अभावामुळे १५ ते ३९ वयोगटात मृत्यूचे दुसरे कारण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धुळीमुळे दमा होण्याची शक्यता ५० ते ६० टक्के असते. सध्या नागपुरात मेट्रो, सिमेंट रस्ते व इमारतीचे बांधकाम प्रचंड प्रमाणात सुरू आहे. यातून उडणाऱ्या धुळीमुळे व वाहनांतून निघणाऱ्या विषारी धुरांमुळेही अस्थमा म्हणजे दम्याचे रुग्ण वाढत आहे. नागपुरात हा आजार १० टक्क्याने वाढल्याची माहिती पल्मनोलॉजिस्ट डॉ. विक्रांत देशमुख यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. विनित निरंजने उपस्थित होते.डॉ. देशमुख म्हणाले, दम्यावर श्वसनमार्गे घेण्यात येणारी प्रभावी औषधे (इन्हेलर) आहेत. परंतु या औषधांना घेऊन अनेक गैरसमज आहे. हे गैरसमजच हा आजार गंभीर होण्यास कारणीभूत ठरत आहे. जर या उपकरणांचा योग्य पद्धतीने वापर केला गेला नाही तर परिस्थती बिघडू शकते. राज्यात ४० ते ६९ वयोगटातील व्यक्तींच्या मृत्यूच्या कारणांमध्ये जुनाट श्वसनाच्या आजाराचे कारण पहिल्या क्रमांकावर आहे. १५ ते ३९ या वयोगटातील व्यक्तींच्या मृत्यूच्या कारणामध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. १९९० मध्ये व्यक्तींच्या मृत्यूचे व अपंगत्वाचे नवव्या क्रमांकाचे कारण असलेली ‘सीओपीडी’ हे २०१६ मध्ये दुसऱ्या क्रमांकाचे कारण म्हणून समोर आले आहे. यातून श्वसनाच्या आजाराचे ओझे आणि त्यांच्या नियमनाची गरज रेखांकित होते.डॉ. विनित निरंजने म्हणाले, भारतातील फिजिशियनचे ज्ञान आणि ‘इन्हलेशन थेरपी’ याचा आढावा घेणाऱ्या एका अभ्यासातून असे लक्षात आले की, इन्हेलरचा चुकीचा वापर केला जात असल्याने श्वसनाच्या आजारावरील उपचारांचे सकारात्मक परिणाम कमी झाल्याचे दिसून आले आहे. दम्याच्या नियमनाचे शिक्षण व त्याबद्दल जागृती निर्माण करणे ही काळाची गरज आहे. साधारण ८० टक्के रुग्ण इन्हेलरचा योग्य वापर करत नसल्याचेही आढळून आले आहे. रुग्णांना इन्हेलर वापरण्याचा प्रशिक्षणावर जोर देण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Healthआरोग्य