शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
5
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
6
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
7
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
8
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
9
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
10
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
11
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
12
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
13
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
14
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
15
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
16
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
17
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
18
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
19
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
20
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
Daily Top 2Weekly Top 5

सहायक कामगार आयुक्त लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय कामगार आयुक्त कार्यालयातील सहायक कामगार आयुक्ताला ६० हजाराची लाच घेताना सीबीआयने रंगेहात पकडले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्रीय कामगार आयुक्त कार्यालयातील सहायक कामगार आयुक्ताला ६० हजाराची लाच घेताना सीबीआयने रंगेहात पकडले. यावेळी त्याच्या कार्यालयासह घराचीही झडती घेण्यात आली. यावेळी त्याच्या घरातून तब्बल ५२ लाख ९ हजार रुपयाची रोख रक्कम व मोठ्या प्रमाणावरील गुंतवणुकीचे दस्तावेजही सीबीआयने जप्त केले. या कारवाईमुळे कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांंमध्ये खळबळ उडाली आहे. सचिन शेलार (४८) असे आरोपीचे नाव आहे.

शेलार हा केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयांतर्गत येणाऱ्या कामगार आयुक्त कार्यालयात सहायक कामगार आयुक्त म्हणून कार्यरत आहे. सेमिनरी हिल्स येथील सीजीओ कॉम्प्लेक्सच्या पहिल्या माळ्यावर हे कार्यालय आहे. याच इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर सीबीआयचे कार्यालय आहे. तक्रारकर्ते उद्योजक आहेत. ते एक कंपनी चालवतात. शेलार यांनी १३ डिसेंबर रोजी उद्योजकच्या फर्म आणि कंपनीची पाहणी केली. त्याने उद्योजकास काही दस्तावेज कार्यालयात सादर करण्यास सांगितले. त्यानुसाार १६ डिसेंबर रोजी तक्रारकर्ते उद्योजक कामगार आयुक्त कार्यालयात पोहोचले. त्यांनी शेलार याला सांगितलेले दस्तावेज सादर केले. यानंतरही शेलारने उद्योजकास त्याच्या घरी येऊन भेटण्यास सांगितले. उद्योजकाने त्याच्या घरी जाऊन भेट घेतली तेव्हा शेलारने पैशाची मागणी केली. संबंधित फर्ममध्ये कामगार नियमांबाबत बऱ्याच अनियमितता आहेत. यामुळे त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते असा इशारा देत कारवाईपासून वाचायचे असेल तर लाच द्यावी लागेल, असे शेलारने उद्योजकास सांगितले. शेलारने तक्रारकर्त्यास मोठ्या रकमेची मागणी केली. परंतु त्यांनी इतकी मोठी रक्कम देण्यास असमर्थता दर्शविली. तेव्हा ६० हजार रुपये मागितले. न दिल्यास त्रास वाढेल असा इशारा दिला. उद्योजकास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १८ डिसेंबर रोजी सीबीआय अधीक्षक निर्मला देवी यांची भेट घेतली. त्यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केली. सीबीआयने २१ डिसेंबर रोजी उद्योजकाच्या तक्रारीची आपल्यास्तरावर चौकशी केली. यात शेलारने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा शेलारला रंगेहात पकडण्याची योजना आखण्यात आली. योजनेनुसार मंगळवारी त्याला कार्यालयातच ६० हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

या कारवाईची माहिती होताच कामगार आयुक्त कार्यालयात खळबळ उडाली. शेलार मूळचा पुण्याचा रहिवासी आहे. त्याचे कुटुंबीय पुण्यात राहतात. तो फ्रेण्ड्स कॉलनीत भाड्याने राहतो. येथे तो चार वर्षांपासून कार्यरत होता. कारवाईनंतर सीबीआयने त्याच्या घरी व कार्यालयाची झडती घेतली. त्याच्या घरी ५२.९ लाख रुपये रोख सापडले. तसेच विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमा केलेले दस्तावेज जप्त करण्यात आले. शेलारला आज बुधवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर सादर करून २ जानेवारीपर्यंत सीबीआय कोठडीत घेण्यात आले.

नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन

केंद्र सरकारच्या कार्यालयामध्ये कुणी लाच मागितली असेल किंवा भ्रष्टाचार होत असल्याचे लक्षात आल्यास सीबीआयकडे तक्रार करावी, असे आवाहन सीबीआयच्या अधीक्षक निर्मला देवी यांनी नागरिकांना केले आहे. सीबीआय प्रत्येक तक्रार गंभीरतेने घेईल. तक्रारदार किंवा माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. त्यांची ओळख पटू दिली जाणार नाही. विदर्भ किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यातील नागरिक सीबीआयच्या फोन नंबर ०७१२-२५१०३८२ किंवा मोबाईल नंबर ९४२३६८३२११ यावर संपर्क करू शकतात.