शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या नावावर होणार थकबाकीदारांच्या मालमत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 20:35 IST

शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांना वारंवार सूचना देऊ नही थकीत कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या जप्त मालमत्तांची विक्री सुरू केली आहे. काही मालमत्तांना लिलावात प्रतिसाद मिळाला नाही, अशा मालमत्ता आपल्या नावावर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच थकबाकीदारांच्या मालमत्ता महापालिकेच्या नावावर होणार आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीची मंजुरी : लिलावात अपेक्षित प्रतिसाद नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांना वारंवार सूचना देऊ नही थकीत कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या जप्त मालमत्तांची विक्री सुरू केली आहे. काही मालमत्तांना लिलावात प्रतिसाद मिळाला नाही, अशा मालमत्ता आपल्या नावावर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच थकबाकीदारांच्या मालमत्ता महापालिकेच्या नावावर होणार आहे.वर्षानुवर्षे थकबाकी असलेल्या मालमत्ताकराच्या वसुलीसाठी महापालिकेने विविध प्रकारची कारवाई केली. थकबाकीदारांना वॉरंट बजावले, जप्तीची कारवाई करून लिलाव करण्यात आला. मात्र यानंतरही थकबाकीदारांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने अशा मालमत्ता आता महापालिके च्या नावावर केल्या जाणार आहते.हनुमाननगर झोनमधील वॉर्ड क्रमांक १४ मधील घर क्रमांक ६६१७/अ‍े /३१, यांच्याकडे मालमत्ता कर व शास्ती अशी २ लाख ६७ हजार ६९६ रुपयांची थकबाकी आहे. या मालमत्तेच्या लिलावाला प्रतिसाद मिळाला नाही. घर क्रमांक ६६३७/अ‍े/३७ च्या मालकाकडे कर व शास्ती अशी २ लाख ४० हजार ४५४ रुपये, मिळकत क्रमांक ६६१७/अ‍े/३२ च्या मालकाकडे २ लाख ६७ हजार २९७ रुपये, वॉर्ड क्रमांक १५ मधील घर क्रमांक ३४७६/२६ च्या मालकाकडे ३ लाख ३८ हजार ४६३ रुपये, घर क्रमांक ३४८६/८२ यांच्याकडे १ लाख ७५ हजार, घर क्रमांक ३४८६/७ यांच्याकडे २ लाख ४४ हजार ७३९ रुपये, वॉर्ड १४ मधील घरक्रमांक ६६१७ /अ‍े /८१ च्या मालकाकडे १ लाख ७६ हजार ३२९ रुपये, घर क्रमांक ६६१७/अ‍े/७८ यांच्याक डे १ लाख ९७ हजार, धरमपेठ झोनमधील वॉर्ड क्रमांक ७३ मधील घर क्रमांक ८३३९/बी च्या मालकाकडे ३३ लाख ८९ हजार रुपये थकबाकी  आहे. यासह लिलावात प्रतिसाद न मिळालेल्या मालमत्ता महापालिकेच्या नावावर केल्या जाणार आहेत.थकबाकीदारांची मालमत्ता वृत्तपत्रात प्रसिद्ध करून जाहीर लिलाव करण्यात आला. परंतु काही मालमत्तांच्या लिलावाला प्रतिसाद मिळाला नाही. अशा मालमत्ता महापालिकेच्या नावावर केल्या जाणार आहेत.१२० मालमत्ता मनपाच्या नावावर होणारशहराच्या विविध भागातील थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव केला जात आहे. मात्र खरेदीदार उपलब्ध न झालेल्या संपूर्ण शहरातील १२० स्थावर मालमत्ता महापालिकेच्या नावावर करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. महापालिकेतर्फे ही कारवाई नियमित सुरू राहणार आहे. अनेक वर्र्षापासून मालमत्ता कर थकीत असणाऱ्यांना थकबाकी भरण्याची शेवटची संधी दिली जाणार आहे.

 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर