लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऐनवेळी घरमालक परतल्याने घरात शिरलेला चोरटा पकडला गेला. त्याला पकडून जमावाने त्याची बेदम धुलाई केली. नंतर त्याला पोलिसांच्या हवाली केले. गुरुवारी रात्री हा प्रकार कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. शेख छोटू शेख दिलावर (वय ३६) असे रंगेहात पकडल्या गेलेल्या चोरट्याचे नाव असून तो बीड जिल्ह्यातील बाग पिपलगाव (ता. गेवराई) येथील रहिवासी आहे.महालमधील कोठीरोडवर सुयश दिलीप जबलपुरे (वय २०) राहतात. गुरुवारी ते त्यांच्या मोठ्या वडिलांकडे असलेल्या पूजेसाठी सहपरिवार गेले होते. रात्री ९ च्या सुमारास ते परत आले. घरी जाताच त्यांना दाराचा कुलूप कोंडा तुटून दिसला. दार मात्र आतून बंद होते. दरम्यान, बाहेर कुणी तरी आल्याचे लक्षात आल्यामुळे घरात चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेला चोरटा शेख छोटू बाल्कनीतून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. ते पाहून जबलपुरे यांनी आरडाओरड केली. शेजारी गोळा झाल्यानंतर आरोपी शेख छोटूला रंगेहात पकडण्यात आले. जमावाने त्याला बेदम चोप दिला. पोलिसांनाही कळविले. कोतवालीचे पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी छोटूला जमावाच्या तावडीतून ताब्यात घेतले. त्याच्यावर उपचार करून घेतल्यानंतर जबलपुरेंच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपीने यापूर्वी नागपुरात कुठे कुठे चोरी, घरफोडी केली. त्याची पोलीस चौकशी करीत आहेत.
नागपुरात जमावाकडून चोरट्याची बेदम धुलाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:41 IST
ऐनवेळी घरमालक परतल्याने घरात शिरलेला चोरटा पकडला गेला. त्याला पकडून जमावाने त्याची बेदम धुलाई केली. नंतर त्याला पोलिसांच्या हवाली केले. गुरुवारी रात्री हा प्रकार कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.
नागपुरात जमावाकडून चोरट्याची बेदम धुलाई
ठळक मुद्देऐनवेळी घरमालक आल्याने घरातच सापडला : कोतवालीत गुन्हा दाखल