शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

क्षुल्लक कारणावरून नागपुरात दोघांवर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 21:30 IST

क्षुल्लक कारणावरून दोघांवर चाकूहल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री घडली.

ठळक मुद्देआरोपी फरार : यशोधरानगर ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्षुल्लक कारणावरून दोघांवर चाकूहल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री घडली. मोहम्मद रफिक मोहम्मद खुर्शिद (वय २९, रा. कुंदनलाल गुप्तानगर, नागपूर) आणि मेहबूब अली अशी जखमींची नावे आहेत.रफिक आणि मेहबूब हे दोघे मित्र आहेत. गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास ते विटाभट्टी चौकाजवळच्या मैदानात गप्पा करीत बसले होते. बाजूलाच आरोपी अन्नू ठाकूर (रा. विनोबा भावे नगर) आणि त्याचा साथीदार सागर उभे होते. रफिकने बाजूला जाऊन लघुशंका केली. त्यावरून अन्नू ठाकूरने त्याला शिवीगाळ केली. परिणामी या दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर अन्नू आणि सागरने रफिकला मारहाण करून त्याच्यावर चाकूहल्ला चढवला. पाठीवर आणि हातावर चाकूचे वार बसल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी मेहबूब धावला. आरोपींनी मेहबूबवरही चाकूहल्ला चढवला. आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी पळून गेले. जखमींना मेयोत दाखल केल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. यशोधरानगरचे पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी रफिक आणि मेहबूबचे बयान नोंदवून घेतले. त्यानंतर अन्नू ठाकूर आणि सागरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपी कुख्यात गुन्हेगारआरोपी अन्नू ठाकूर हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याला विविध अमली पदार्थांचेही व्यसन आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. घटनेपूर्वी तो मैदानात साथीदार सागरसह नशा करीत बसला होता. चाकूहल्ला केल्यानंतर दोघेही फरार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर