शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कोलकातामधील कंपनी अधिकाऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:44 IST

साडेतीन लाखांचा डीडी परत मिळवण्यासाठी चौघांनी कोलकाता येथील एका कंपनीच्या अधिकारी तसेच वितरकाला बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडून ३०० अमेरिकन डॉलरसह ४ लाख, १० हजारांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. शनिवारी रात्री सुरू झालेला हा सिनेस्टाईल ओलीस ठेवून लुटमार करण्याचा प्रकार रविवारी पहाटे ३ ला संपला.

ठळक मुद्देपहाटेपर्यंत ओलीस ठेवले : अमेरिकन डॉलरसह, रक्कमही हिसकावून घेतली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साडेतीन लाखांचा डीडी परत मिळवण्यासाठी चौघांनी कोलकाता येथील एका कंपनीच्या अधिकारी तसेच वितरकाला बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडून ३०० अमेरिकन डॉलरसह ४ लाख, १० हजारांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. शनिवारी रात्री सुरू झालेला हा सिनेस्टाईल ओलीस ठेवून लुटमार करण्याचा प्रकार रविवारी पहाटे ३ ला संपला. सोनेगाव पोलिसांनी या प्रकरणी रविवारी गुरुप्रितसिंग हरबंससिंग दडियाल (वय २८), अजितसिंग हरबंससिंग दडियाल (वय ३१, दोघेही रा. नारी रोड, पॉवरग्रिडजवळ उप्पलवाडी) यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला.अविनाश गंगाप्रसाद शा (वय ३४) हे कोलकाता (पश्चिम बंगाल) येथील एका कंपनीचे प्रतिनिधी आहेत. या कंपनीसोबत आरोपी दडियालबंधूंनी खरेदी आणि वितरणाचा करार केला होता. त्यासाठी कंपनीला साडेतीन लाखांचा डीडी दिला होता. नंतर त्यांनी कंपनीसोबत झालेला करार मोडला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कंपनीच्या कामाने नागपुरात आलेले शा वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये २५१ क्रमांकाच्या रूममध्ये थांबले होते. शनिवारी रात्री ९.३० ला आरोपी दडियाल बंधू आपल्या दोन साथीदारांसह तेथे पोहचले. त्यांनी शा यांना आपला साडेतीन लाखांचा डीडी किंवा रक्कम परत पाहिजे, अशी मागणी केली. शा यांनी डीडी लगेच परत देता येणार नाही. मी कोलकाताला पोहचल्यावर डीडी कुरियरने पाठवतो, असे म्हटले. दडियाल बंधूंनी त्यावरून शा सोबत वाद घातला आणि त्यांना तसेच त्यांच्यासोबत असलेले कंपनीचे वितरक परमिंदरसिंग यांना वायरने मारहाण सुरू केली. एवढेच नव्हे तर शा यांचे डेबिट कार्डमधून ५० हजार रुपये काढून घेतले. स्वॅप मशिनद्वारे ३ लाख, २० हजार रुपये आॅनलाईन ट्रान्सफर केले. त्यांच्याजवळचे ३०० अमेरिकन डॉलर आणि २० हजारांचे हातघड्याळ असा एकूण ४ लाख, १० हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. रविवारी पहाटे ३ वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता.दोघांना अटक, दोघे फरारया प्रकारामुळे शा आणि परमिंदरसिंग प्रचंड दहशतीत आले. आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर शा यांनी हॉटेल प्रशासनाची मदत घेऊन सोनेगाव पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी धावपळ करून आरोपी दडियाल बंधूंना अटक केली. त्यांचे दोन साथीदार फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर