लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नॅशनल सिव्हील डिफेन्स कॉलेज (एनसीडीसी) येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या आसाममधील एका अधिकाऱ्याचा अचानक येथे मृत्यू झाला.कुमुद नाथ (वय ५०) असे मृताचे नाव आहे. ते तेजपूर (आसाम) येथील रहिवासी होत. विशेष प्रशिक्षणासाठी ते येथील एनसीडीसी ट्रेनिंग सेंटरमध्ये आले होते. प्रशिक्षण सुरू असताना बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना अंबाझरी पोलीस ठाण्याजवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत असताना सायंकाळी ६.२५ ला त्यांचा मृत्यू झाला. प्रारंभी या प्रकरणाची नोंद अंबाझरी ठाण्यात करण्यात आली. नंतर तपासासाठी ती केसडायरी सीताबर्डी ठाण्यात पाठविण्यात आली. कुमुद नाथ यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असावा, असा संशय आहे. सीताबर्डी पोलीस तपास करीत आहेत.
नागपूरमधील एनसीडीसीमध्ये आसाममधील अधिकाऱ्याचा प्रशिक्षणादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 20:09 IST
नॅशनल सिव्हील डिफेन्स कॉलेज (एनसीडीसी) येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या आसाममधील एका अधिकाऱ्याचा अचानक येथे मृत्यू झाला.
नागपूरमधील एनसीडीसीमध्ये आसाममधील अधिकाऱ्याचा प्रशिक्षणादरम्यान मृत्यू
ठळक मुद्देहृदयविकाराची शक्यता